राष्ट्रवादी शेवटपर्यंत सरकार पडू देणार नाही आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देणारच-जयंत पाटील

शेवटपर्यंत आम्ही सरकार पडू देणार नाही असा देखील विश्वास पाटलांनी व्यक्त केलाय. यामुळे शेवट पर्यंत आम्ही लढत राहू आणि ठाकरेंना पाठिंबा देणार. शरद पवारांच्या घरी झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर जयंत पाटलांनी ही माहिती दिली आहे.

NCP will support the Chief Minister, discussed in Sharad Pawar's meeting
राष्ट्रवादी शेवटपर्यंत सरकार पडू देणार नाही, मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देणारच, पवारांच्या बैठकित चर्चा

महाराष्ट्रात राजकीय भूकंप,सत्तानाट्या,सत्तांतर,बंडखोरी या घडामोडींना वेग आला असून सध्या तरी सत्तेत असलेली महाविकास आघाडी आता कोणत्याही क्षणी कोलमडण्याची शक्यता असून सर्व पक्षांच्या आमदारांच्या, खासदारांच्या बैठका सुरू आहे. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी नेत्यांना महत्वपूर्ण सुचना दिल्यात. यासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माहिती दिली (NCP will support the Chief Minister, discussed in Sharad Pawar’s meeting)

शरद पवारांच्या बैठकीत काय चर्चा झाली.

महाविकास आघाडी सरकार पडू नये यासाठी राष्ट्रवादी पूर्णपणे ठाकरेंना मदत करणार असून एकनाथ शिंदे यांच्या बंडाची कारणं आणि सेनेच्या अंतर्गत वादाबाबत आम्हाला माहिती नाही असं देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. यासह बंडखोरी केलेले आमदार आज ना उद्या परत येतीलच ते परत आल्यावर अधिक चित्र स्पष्ट होईल आणि असा विश्वास आजही आम्हाला वाटतोय. उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला तसेच आमदारांना दिलेली भावनिक साद ऐकून त्याला आमदार सकारात्मक प्रतिसाद देतील अशी आम्हाला खात्री आहे असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय

शेवटपर्यंत आम्ही सरकार पडू देणार नाही असा देखील विश्वास पाटलांनी व्यक्त केलाय. यामुळे शेवट पर्यंत आम्ही लढत राहू आणि ठाकरेंना पाठिंबा देणार. शरद पवारांच्या घरी झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर जयंत पाटलांनी ही माहिती दिली आहे.

एकनाथ शिंदेंच्या गटात किती आमदार

शिवसेनेच्या शिंदे गटात अपक्षांसह ४६ आमदार आहेत. तसेच, अनेक खासदारही त्यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहिल्यानंतर एकनाथ शिंदे सत्तास्थापनेचा दावा करतील असंही म्हटलं जातंय.


हे ही वाचा –  ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदेंकडून कायदेशीर लढाई सुरू? मूळ पक्षासाठी प्रयत्न करणार