घरराजकारण"काहींचे भाषण...", दसरा मेळाव्यांबाबत राष्ट्रवादीच्या अजित पवारांची बोलकी प्रतिक्रिया

“काहींचे भाषण…”, दसरा मेळाव्यांबाबत राष्ट्रवादीच्या अजित पवारांची बोलकी प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात बुधवारी प्रथमच शिवसेनेचे दोन दसरे मेळावे झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. दोघांनीही एकमेकांवर शरसंधान केले आणि त्याबाबत आता राजकीय प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या भाषणांबाबत विशेष टिप्पणी केली आहे.

शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी जवळपास अर्धा तास भाषण केले. त्यावर त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. शिंदे गटाचा गद्दार, खोकेसूर असा उल्लेख करत तुम्ही साथ आणि सोबत द्या, मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिला. तर, एकनाथ शिंदेंनी जवळपास दीड तास भाषण केले आणि त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाला उत्तर दिले. शिवाय, काही खळबळजनक आरोपही केले.

- Advertisement -

हेही वाचा – …याच कारणासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली, चिन्हाबाबत शिवसेनेने केले स्पष्ट

या दोन भाषणांपैकी कोणते भाषण तुम्हाला आवडले असे अजित पवार यांना बारामतीमध्ये विचारले असता, ते म्हणाले. कोणाच्या आवडी-निवडीसाठी ही भाषणे नव्हती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी दसऱा मेळाव्यात शिवसैनिक येत होते. आता पिढ्या बदलल्या तरी लोक दसरा मेळाव्याला येत आहेत. मी टीव्हीवर दोघांचीही भाषणे ऐकली. त्यावर टीका करण्याचे काही कारण नाही. पण काहींची भाषणे अकारण लांबली, असे अजित पवार म्हणाले. दोन्ही दसरा मेळाव्यांना गर्दी झाली होती. प्रसारमाध्यमांनी देखील त्यांच्याशी संवाद साधला. त्यातल्या काहींना आपल्याला येथे का आणले आहे, हेच माहीत नसल्याचे बातम्यांवरून समजले, असे सांगून महाराष्ट्रातील जनतेने कोणाची मूळ शिवसेना आहे आणि कोणाच्या पाठीशी उभे राहायला पाहिृजे, याचा सारासार विचार शिवसेनिकांनी केला पाहिजे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

- Advertisement -

हेही वाचा – डीआरडीओकडून पुण्यात मानवविरहीत बोटीची यशस्वी चाचणी

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -