घरराजकारणगुजरात निवडणूकगुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोडला प्रचाराचा नारळ, रोड शोमध्ये केलं जनतेला संबोधित

गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोडला प्रचाराचा नारळ, रोड शोमध्ये केलं जनतेला संबोधित

Subscribe

Gujarat Election 2022 : गुजरातमधील आदिवासी बांधवांसोबत मी माझ्या प्रचार सभेला सुरुवात करतोय हे माझं बाग्य आहे. यावेळेस रेकॉर्ड बनवण्याकरता गुजरात मला जिंकवेल, असाही विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

अहमदाबाद – गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांची (Gujarat Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. आज त्यांनी एक रोड शो केला. त्यानंतर, ते वलसाड येथे पोहोचले. वलसाडमध्येही त्यांनी एका रॅलीला संबोधित केलं. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलसुद्धा उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे घोषवाक्य दिले. मी इथे गुजरात बनवलं आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा – निवडणुकीआधीच गुजरातमध्ये भाजपाला धक्का; ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

- Advertisement -

गुजरातच्या तरुणांना जबाबदारीची जाणीव झाली आहे. त्यांनी आपल्या हातात सुत्रे घेतली आहेत. द्वेष पसरवणाऱ्यांना गुजरातने कधीच निवडून दिलं नाही. परंतु, काही लोक गुजरातला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, गुजरातचे लोक त्यांना चांगलंच वठणीवर आणतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वलसाड येथे जनतेला संबोधित करताना म्हटलं आहे. तसंच, गेल्या २० वर्षांपासून गुजरातमध्ये विभाजन करण्याचं कारस्थान सुरू आहे. पण अशांनाही गुजरात धडा शिकवेल असंही मोदी म्हणाले.


गुजरातमधील आदिवासी बांधवांसोबत मी माझ्या प्रचार सभेला सुरुवात करतोय हे माझं बाग्य आहे. यावेळेस रेकॉर्ड बनवण्याकरता गुजरात मला जिंकवेल, असाही विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा गुजरात विधानसभा निवडणूक : काँग्रेसच्या 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी भावनगर येथे पोहोचणार आहेत. तिथे पीएम पापा की परी या योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात ते सामील होते. या सामूहिक विवाह सोहळ्यात ५२२ मुलींचं लग्न पार पडणार आहेत. ज्या मुलींच्या डोक्यावर वडिलांचं छत्र हरपलं अशा मुलींची लग्न इथे होणार आहेत.

हेही वाचा – Gujarat Election: २०१७ मध्ये सर्वाधिक जिल्ह्यात काँग्रेसची मुसंडी, मग भाजपाने कशी सत्ता स्थापन केली?

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -