Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण प्रत्येक घरात बेकारी, राहुला गांधी यांची मोदी सरकारवर टीका

प्रत्येक घरात बेकारी, राहुला गांधी यांची मोदी सरकारवर टीका

Subscribe

नवी दिल्ली : महागाई आणि बेकारी या प्रश्नांवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. या दोन मुद्द्यांवरून शुक्रवारी काँग्रेसतर्फे देशभरात आंदोलन करण्यात आले. काँग्रेसने तरुणांच्या बेकारीचा मुद्दा लावून धरला आहे. राहुल गांधी यांनी आज ट्विटरवरून बेकारीचा ग्राफ शेअर करत प्रत्येक घरात बेकारी असल्याची टीका केली आहे.

बेरोजगारी, महगाई, जीवनावश्यक वस्तुंवरील जीएसटी, ईडीसह केंद्रीय पथकांचा कथित गैरवापर या मुद्द्यांवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रपती भवनापर्यंत मार्च काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र पोलिसांनी त्यांना विजय चौकात रोखले. त्यामुळे त्यांनी तेथेच ठिय्या दिला. या आंदोलनात काँग्रेसचे खासदार काळे कपडे परिधान करून सहभागी झाले होते. काँग्रेस खासदार राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना या आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आले.

- Advertisement -

शिवसेनेने काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेचे ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखातून कौतुक केले आहे. पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसवरही शरसंधान केले आहे. महागाई, बेरोजगारी, जीएसटीच्या प्रश्नांवर आणि ‘ईडी’ वगैरे केंद्रीय तपास यंत्रणांच्या अतिरेकी वागण्यावर काँग्रेस हा एकमेव पक्ष लढा देत आहे. काँग्रेस रस्त्यावर उतरत आहे हे चित्र निर्माण झाले आहे व त्याची दखल देशातील अन्य विरोधी पक्षांनी घेऊ नये याचे आश्चर्य वाटते, असे शिवसेनेने सुनावले आहे.

- Advertisement -

त्या पाठोपाठ राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून बेकारीच्या प्रश्नावर मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. ‘गरज : घराघरात रोजगार; वास्तव : प्रत्येक घरात बेकार’ असे कॅप्शन देत जागतिक बँकेचा हवाला देत, बेकारीबद्दलचे ग्राफिक्स त्यांनी शेअर केले आहे. त्यात तरुणांच्या बेकारीचे प्रमाण 28.3 टक्के असल्याचे दिसते.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -