घरराजकारणहिमाचल प्रदेशमध्ये राहुल गांधींची जादू चालणार, एक्झिट पोलमधून काँग्रेसची सत्ता येणार

हिमाचल प्रदेशमध्ये राहुल गांधींची जादू चालणार, एक्झिट पोलमधून काँग्रेसची सत्ता येणार

Subscribe

हिमाचलमध्ये भाजपला 24-34 जागा मिळतील. काँग्रेसला 30-40 जागा मिळण्याचे संकेत आहेत. इतरांना 4-8 जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाला एकाही जागेवर विजय मिळताना दिसत नाही.

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत पाहायला मिळत आहे. अटीतटीच्या लढतीत काँग्रेस काठावर पास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज तक-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 42 टक्के, काँग्रेसला 44 टक्के आणि ‘आप’ला 2 टक्के मते मिळाली आहेत. 2017 मध्ये भाजपला 48.79 टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसला 41.6 टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसचा जुनी पेन्शन बहाल करण्याचा मुद्दा लोकांना आवडलेला दिसत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा फायदा होताना दिसत आहे. तसेच एक्झिट पोलमध्येही भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

हिमाचलमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?

- Advertisement -

हिमाचलमध्ये भाजपला 24-34 जागा मिळतील. काँग्रेसला 30-40 जागा मिळण्याचे संकेत आहेत. इतरांना 4-8 जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाला एकाही जागेवर विजय मिळताना दिसत नाही. हिमाचलमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी एकूण 68 जागांपैकी 35 जागांची गरज आहे. अंदाजानुसार यावेळी भाजपला 29 तर काँग्रेसला 35 जागा मिळत आहेत.

कोणत्या पक्षाला कोणत्या भागात बहुमत?

- Advertisement -

कांगडा (25)- भाजपला 9, काँग्रेसला 15 आणि इतरांना एक जागा मिळत आहे.
मंडी (24)- भाजपला 13 जागा, काँग्रेसला 9 आणि इतरांना 2 जागा
शिमला (19) – भाजपसाठी 7 जागा, काँग्रेससाठी 11 आणि इतरांसाठी एक जागा

हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात सर्व 68 जागांवर मतदान झाले. यावेळी 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला लागणार आहे. मात्र निकालापूर्वीच एक्झिट पोलचे निकाल समोर येत आहेत. सध्या हिमाचल प्रदेशात सत्ता किंवा प्रथा बदलणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रचारात पूर्ण ताकद लावली होती. 2017 मध्येही भाजपने राज्यात विजय मिळवला होता. मात्र, आतापर्यंत दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याचा ट्रेंड होता. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागांसाठी 12 नोव्हेंबरला मतदान झाले होते. हिमाचलमध्ये यावेळी 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. राज्यात 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 75.57 टक्के मतदान झाले होते. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या 73.5 टक्के मतदानापेक्षा हे प्रमाण जास्त आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपला 44 जागा मिळाल्या होत्या

हिमाचल विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 8 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. हिमाचल विधानसभेच्या 68 जागांसाठी 9 नोव्हेंबर 2017 रोजी मतदान झाले होते. भाजपने 68 पैकी 44 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. जयराम ठाकूर यांना मुख्यमंत्री केले होते.

या दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद

या निवडणुकीत मुख्यमंत्री जयराम ठाकूर, माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह आणि भाजपचे माजी अध्यक्ष सतपाल सिंह सत्ती यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही हिमाचलमध्ये जोरदार प्रचार केला. तर पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा या काँग्रेस पक्षातून सक्रिय होत्या. प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेसमध्येच थेट लढत पाहायला मिळत आहे.


हेही वाचाः गुजरातमध्ये मोदींचाच बोलबाला, एक्झिट पोलमधून पुन्हा भाजपला सत्ता

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -