घरराजकारणगुजरात निवडणूकराहुल गांधी घेणार भारत जोडो यात्रेत ब्रेक, 'हे' कारण आलं समोर

राहुल गांधी घेणार भारत जोडो यात्रेत ब्रेक, ‘हे’ कारण आलं समोर

Subscribe

हिमाचलमध्ये प्रियंका गांधींसह अनेक स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या. त्यातच, आता राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये जाऊन प्रचारसभा घेण्याचे ठरवले आहे.

अहमदाबाद – सध्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) व्यस्त असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) गुजरातमध्येही (Gujarat Election 2022) प्रचार दौऱ्यासाठी जाणार आहेत. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना राहुल गांधी गुजरातमध्ये कधी जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. २२ नोव्हेंबर रोजी ते गुजरातमध्ये जाणार आहेत. भारत जोडो यात्रेत थोडासा ब्रेक घेऊन राहुल गांधी गुजरातमध्ये जाणार आहेत. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने ते सध्या महाराष्ट्रात आहेत. २० तारखेला ही यात्रा मध्य प्रदेशला पोहोचेल.

हेही वाचा गुजरात विधानसभा निवडणुकीत कुटुंबांमध्येच होणार राजकीय लढत; सख्ख्ये येणार आमने-सामने

- Advertisement -

हिमाचल प्रदेश येथील निवडणुकीसाठी राहुल गांधी प्रचारासाठी गेले नव्हते. तेथे १२ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. त्यांनी हिमाचलमध्ये प्रचार केला नसल्याने भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला होता. हिमाचलमध्ये प्रियंका गांधींसह अनेक स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या. त्यातच, आता राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये जाऊन प्रचारसभा घेण्याचे ठरवले आहे.

हेही वाचा ‘गुजरात निवडणुकी’साठी नितीन गडकरींवर मोठी जबाबदारी

- Advertisement -

हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये आता लक्षकेंद्रीत करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. याचे निकाल ८ डिसेंबर लागणार आहेत.
विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आतापर्यंत १४२ उमेदवारांची नावे त्यांनी जाहीर केली आहेत. ४ नोव्हेंबर रोजी त्यांनी पहिली यादी जाहीर केली. यामध्ये ४३ उमेदवारांची नावे होती. दुसऱ्या यादीत ४६ तर, शुक्रवारी जाहीर केलेल्या यादीतही अनेकांची नावे आहेत.

गुजरातमध्ये तिहेरी लढत

गुजरातमध्ये तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तो शाबूत राहण्याकरता भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नरेंद्र मोदी गेल्या महिन्याभरात दोन ते तीन वेळा गुजरातला गेले. तसंच, आपनेही येथे सत्ता स्थापन करण्यासाठी आपले प्रयत्न पणाला लावले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करून गुजराती मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. तर, काँग्रेसही येथे कडवी लढत देण्याचा प्रयत्न करत आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -