पाडव्याला राज ठाकरेंचा सिनेमा; मनसेच्या मेळाव्यात करणार मोठी घोषणा

Raj Thackeray on Girish Bapat death
राज ठाकरेंनी वाहिली गिरीश बापटांना श्रद्धांजली

पनवेलः मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने पनवेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाणाबाबत दिलेला निकाल दुर्दैवी आहे का की पक्ष चांगल्या माणसाच्या हातात गेला, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी आज त्यावर काहीच बोलणार नाही. मला कोणत्याही प्रकारचा ट्रेलर आणि टीझर दाखवायचा नाही. मी येत्या २२ तारखेला थेट सिनेमा दाखवणार आहे, असे उत्तर त्यांनी दिले.

आपल्या मुलाखतीत राज ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या ज्या काही राजकीय घडामोडी सुरू आहेत, त्यावर मी येत्या २२ मार्चला शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळाव्यात बोलणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणासाठी विधान भवनात गेलो होतो. त्यावेळी सगळे बसले होते. मला कळतच नव्हते कोण कोणत्या पक्षातला. सध्या कोणी आमदार आला की कुठल्या पक्षाचा हे विचारावे लागते. सध्या कुठला आमदार कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही. राजकारणाचा सर्व चिखल झाला आहे. असा महाराष्ट्र कधीही नव्हता. विरोध असेल किंवा कोणत्याही प्रकारची गोष्ट असेल पण या सर्व गोष्टी आमने-सामने असायच्या.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मनसेच्या एका आमदाराचे उदाहरण देऊन निवडणूक आयोगावर टीका केली. त्यावर बोलताना म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतोय, असे एका वाक्यात उत्तर देत अधिक बोलणे त्यांनी टाळले. राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत. त्यांचा उल्लेख करून राज ठाकरे म्हणाले की, मला राजू पाटीलला ही विचारून पाहायचे आहे की पक्ष ताब्यात घेता का म्हणून? दिवसरात्र आम्ही बरनॉल लावत असतो. आमचे जे जळते आहे, ते तुम्हाला कळणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.