शिवसेनेत दोनच माणसे शिल्लक राहणार…, भाजपाच्या दानवेंची खोचक टीका

Raosaheb Danve

मुंबई : शिवसेनेचे आदित्य ठाकरे हे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस झाले असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. आता त्यापाठोपाठ भाजपाने देखील यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेत आता दोनच माणसे शिल्लक राहणार असल्याची खोचक टीका भाजपा नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

“नियतीचा खेळ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘संपलेला पक्ष’ म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस झाले आणि चिन्ह देखील गमवण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले! म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये!, #शिल्लकसेना”, अशी पोस्ट मनसेच्या फेसबुक पेजवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या फोटोसह शेअर करण्यात आली आहे.

हेही वाचा – ओबीसी समाजावर घोर अन्याय; नगरपालिका निवडणुकांना राष्ट्रवादीचा विरोध

त्यापाठोपाठ रावसाहेब दानवे यांनीही, शिवसेनेत दोनच माणसं शिल्लक राहणार आहेत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, असा सणसणीत टोला लगावला आहे. तसेच जी राहिली आहे, ती शिवसेना फुटू देऊ नका, असा सल्लाही दानवे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिला आहे.

शिवसेनेचे 12 खासदार आमच्या संपर्कात असून पुढील नगरपालिका, पंचायत समित्या, महापालिका निवडणुका आम्हीच जिंकू, असा दावा त्यांनी केला. गेल्या वेळी 92पैकी 82 नगरपालिका एकट्या भाजपने जिंकल्या होत्या. त्यावेळी तर युतीही नव्हती, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमच्यासोबत आहेत. 12 जिल्हा परिषद, 16 महापालिका आम्ही पूर्वी जिंकल्या होत्या, अशी पुस्तीही दानवे यांनी जोडली.

हेही वाचा – श्रीलंकेतील स्थिती आणखी गंभीर, नागरिक आक्रमक होताच राष्ट्रपतींचा पळ