घरराजकारणगुजरात निवडणूकGujarat Elections : क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी लढवणार निवडणूक, भाजपाकडून उमेदवारी जाहीर

Gujarat Elections : क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी लढवणार निवडणूक, भाजपाकडून उमेदवारी जाहीर

Subscribe

अहमदाबाद – गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Gujarat Former CM Vijay Rupani) यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी गुजरात विधानसभा निवडणूक (Gujarat Election 2022) लढवण्यास नकार दिला आहे. तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी असं म्हणत अनेक ज्येष्ठ नेत्यांनी माघार घेतलेली असताना क्रिकेटर रवींद्र जडेजाची (Cricketer Ravindra Jadeja) पत्नी रिवाबा जडोजा (Riwaba Jadeja) यांना भाजपाने तिकिट दिली आहे. जामनगर उत्तर मतदारसंघातून (North Jamnagar constitution) तिकिट देण्यात आली आहे. रिवाबा जडेजा यांनी तीन वर्षांपूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला होता. (Riwaba Jadeja Get ticket from BJP for Gujarat Elections)

हेही वाचा Gujarat Election 2022: माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा निवडणूक लढवण्यास नकार

- Advertisement -

रिवाबा जडेजा या मूळच्या गुजरातमधील राजकोट येथील आहे. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलंय. भाजपाने काल गुजरात निवडणुकांची यादी जाहीर केली. या यादीत रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांचंही नाव होतं.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक नुकतीच दिल्लीत पार पडली. या बैठकीनंतर भाजपाने गुजरात निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जारी केली. गुजरातचे भाजपा प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी यादी जाहीर केली. रिवाबा यांना जामनगर उत्तर विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. या विधानसभा मतदारसंघात भाजपाचे धर्मेंद्रसिंह जडेजा विद्यमान आमदार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – विनाश मॉडेल VS विकास मॉडेल! गुजरात निवडणुकीसाठी ‘आप’कडून उमेदवारांची १३ वी यादी जाहीर

ज्येष्ठ नेते निवडणूक लढवणार नाहीत

गुजरातमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. एकीकडे निवडणुकांचा माहोल सुरू झालेला असताना दुसरीकडे भाजपामध्ये धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. कारण, भाजपामध्य अनेक वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला असून त्यांनी तरुणांना संधी देण्याचं आवाहन केलं आहे.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले, मी पाच वर्षे सर्वांच्या सहकार्याने मुख्यमंत्री म्हणून काम केले. मात्र, आता नवीन कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली पाहिजे. मी निवडणूक लढवणार नाही, असे मी दिल्लीला वरिष्ठांना पत्र पाठवून कळवले आहे. निवडलेल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनीही आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -