शिवसेनेच्या, ठाकरे गट आवाजा कुणाचा या पॉडकास्टमध्ये विविध नेत्यांनी हजेरी लावली आहे. यापूर्वीच्या भागात शिवसेना, ठाकरे गटाच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली होती. आता खासदार संजय राऊत यांची मुलाखत समोर आली आहे. यामध्ये निवडणुका, ईडीवर भाष्य करत संजय राऊतांनी भाजपला इशारा दिला आहे. तसंच, यावेळी राऊत यांनी बाळासाहेबांच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. ( Sanjay Raut criticized BJP ED and also talked on Balasaheb Thackeray on Podcast )
काय म्हणाले संजय राऊत?
राऊत म्हणाले की, ज्या मूळ कारणासाठी शिवसेना स्थापन झाली ती, परिस्थितीही बदलत गेली. मराठी माणूस ज्याला तुम्ही घाटी, कोकणी म्हणत होतात, भिकारी म्हणत होतात. मराठी माणसाला प्रतिष्ठा नव्हती. आज बाळासाहेबांनी 50 वर्षांत अथक प्रयत्नांनी कष्टाने ही प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्यानंतर काही प्रश्न कमी झाले. पण संघटना तीच आहे. बाळासाहेबांचीच शिवसेना आहे. शेवटपर्यंत ती बाळासाहेब ठाकरेंचीच राहील. ही शिवसेना उद्धव ठाकरेंची नाही. उद्धव ठाकरेही म्हणतात ही शिवसेना माझी नाही. ही शिवसेना बाळासाहेबांची. आम्ही सगळे या प्रवाहात आहोत तो बाळासाहेबांचा विचार घेऊन. आमचा आत्मा त्यामध्ये असल्याचेही खासदार संजय राऊत म्हणाले.
काँग्रसेवर बोलताना राऊत म्हणाले की, कोणताही पक्ष किंवा संघटना हे तुम्ही तो मूळ निर्माता असतो त्याची भूमिका आणि विचार अनेक पिढ्यांना घेऊन पुढे जात असते. काँग्रेस कोणी स्थापन केली? ती काँग्रेस आज आहे का? स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेस. हजारो लोक तुरुंगात गेले. घरा-दारांवर तुळशीपत्र ठेवलं. लोक फासावर गेले, ती काँग्रेस. पण आता पक्ष बदलत गेला. राजकारण बदलत गेलं. तशीच शिवसेना आहे.
( हेही वाचा: “नाही तर जेवणावेळी…”, राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांच्या भोजन कार्यक्रमावर टीका )
अग्रलेख आवडला तर शाबासकी द्यायचे
संजय राऊत म्हणाले की, जेव्हा मी सामनामध्ये आलो तेव्हा मला अग्रलेख लिहिता येत नव्हता. मात्र, मी लिखाणाबाबत कधीच माघार घेतली नाही. या विषयांवर बाळासाहेबांसोबत नेहमी चर्चा व्हायची. ते नेहमी अग्रलेख वाचायचे. त्यांना अग्रेलख आवडला तर ते शाबासकी द्यायचे आणि काही चुकलं तर वडिलांप्रमाणे रागवायचेय पण मात्र जाहीर सभांमधून त्यांनी अनेकदा कौतुकही केलं आहे. प्रमुख आणि वरिष्ठ लोकांशी ते माझी सहसंपादक म्हणून ओळख करून द्यायचे.