लाॅरेन्स बिश्नोईच्या नावाने खासदार संजय राऊत यांना जीव मारण्याची धमकी

संजय राऊत यांना लाॅरेन्स बिश्नोई याच्या नावाने जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. 

Thackeray group Samana paper criticised BJP and Amit Shah over hindu Muslim conflict
स्वार्थासाठी दंगलीचे भूत उकरुन काढायचे, असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. अमित शाहांच्या कर्नाटकातील वक्तव्याचा सामनातून समाचार घेण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना लाॅरेन्स बिश्नोई याच्या नावाने जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे.  धमकी देणारा पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या धमकी प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्तही समोर आले आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, दिल्लीत आल्यानंतर तुम्हाला उडवून देण्यात येईल. या धमकीच्या मेसेजमध्ये अभिनेता सलमान खानच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने संजय राऊत यांना धमकी देण्यात आली आहे.

मेसेजमध्ये नेमके काय?

संजय राऊत यांना आलेल्या या धमकीच्या मॅसेजमुळे खळबळ उडाली आहे. हा धमकीचा मेसेज राऊत यांच्या मोबाईलवर आला आहे. हिंदूविरोधी असल्यामुळे मारुन टाकू, दिल्लीमध्ये आल्यावर AK 47 ने उडवून टाकू, मुसेवाला टाईप करु.. लाॅरेन्स के और से मॅसेज है, सलमान और तू फिक्स, तयारी करके रखना, असे या मॅसेजमध्ये म्हटले आहे. तसेच, या मॅसेजमध्ये संजय राऊत यांना अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली आहे.

राऊतांची सुरक्षेत घट 

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. गृहविभागाने काही राजकीय नेत्यांची राजकीय सुरक्षा कमी केली होती. यात संजय राऊत यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. मात्र राज्यात शिंदे -फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राऊत यांची वाय दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली. आता त्यांच्यासोबत फक्त एक शस्त्रधारी मुबंई पोलीस असतो.

मागील महिन्यातच राऊत यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.

 

( हेही वाचा: पुण्यातील भावी खासदार ठरले: बापट यांना जाऊन तीन दिवस झाले नाहीत, तोच बॅनरबाजी; राष्ट्रवादीने घेतला समाचार )