Eco friendly bappa Competition
घर राजकारण देश हुकूमशाहीच्या वाटेवर, पण आम्ही...; संजय राऊत यांचा केंद्रावर घणाघात

देश हुकूमशाहीच्या वाटेवर, पण आम्ही…; संजय राऊत यांचा केंद्रावर घणाघात

Subscribe

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि खासदार राहुल गांधी यांना सुरत येथील जिल्हा सत्र न्यायालयाकडून मोदी आडनाव बदनामी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी त्यांना जमीन देखील मंजूर करण्यात आला आहे. पण यावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून टीका केली होती. याप्रकरणी सुरत जिल्हा सत्र न्यायालयात आज गुरुवारी (ता. २३ मार्च) सुनावणी करण्यात अली. या प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावणीत आली. पण त्यानंतर लगेच १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जमीन देखील मंजूर करण्यात आला. याप्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. देश सध्या हुकूमशाहीच्या वाटेवर आहे. पण आम्ही लोकशाहीची लढाई लढत राहू, असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्यावर मुक्काम पोस्ट सुरत येथील न्यायालयात सुनावणी करण्यात आली. हे न्यायालय गुजरातमध्ये आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्याच्यामुळे वेगळा निकाल लागेल, अशी अपेक्षाही नव्हती, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी एका सभेमध्ये केलेलं हे भाषण आहे. ते जे काही बोलले ते भाषणाच्या ओघात बोलले. यामध्ये कोणाची मानहानी झाली? का झाली? हे स्पष्ट झाले पाहिजे. ईडी, सीबीआय, न्यायालय हे सर्व एका विशिष्ट दिशेने चालले आहेत. ही दिशा हुकूमशाहीला आमंत्रण देणारी आहे. विरोधकांचा दडपण्याची दिशा आहे. पण यामुळे विरोधकांचे ऐक्य मजबूत होईल, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये वक्तव्य केले म्हणून त्यांचा विरोध झाला. सुरत न्यायालयाने आज त्यांच्यावर अशी सुनावणी दिली. पण गौतम अदानी प्रकरणावर बोलल्यामुळे केंद्र सरकारकडून संसद चालू दिली जात नाही. त्यामुळे अशा पद्धतीने देशाची वाटचाल ही हुकूमशाहीच्या दिशेने होत आहे. पण आम्ही देशाच्या लोकशाहीसाठी लढत राहू, असे राऊतांनी यावेळी सांगितले. आम्ही आजही सावरकरांसमोर नतमस्तक आहोत आणि हीच आमची भूमिका आहे, असेही ते म्हणाले. तर सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी भूमिका आम्ही पहिल्यांदा आम्ही मांडली होती, मग यासाठी भाजप मागे का हटत आहे? असा प्रश्न देखील राऊतांनी यावेळी उपस्थित केला.


हेही वाचा – खोके घेऊन गुडघे टेकले असते तर आज मी नेतेपदावर असतो, संजय राऊतांची शिंदेंवर जहरी टीका

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -