घरराजकारणउडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…; सत्यजित तांबेंना नेमकं म्हणायचंय काय?

उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…; सत्यजित तांबेंना नेमकं म्हणायचंय काय?

Subscribe

सत्यजीत तांबे यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केलेल्या एका चारोळीमुळे उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. शिक्षण पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. ज्यामुळे तांबे पिता-पुत्रांना पक्षातून निलंबित करण्यात आले.

शिक्षण पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे काँग्रेस पक्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. यामुळे काँग्रेस पक्षामधील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आले. ज्यानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि त्यांचे वडील सुधीर तांबे यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले. तर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी झाल्यानंतर सत्यजित यांचे मामा आणि कॉंग्रेसेक्सही गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला. बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा देताच काँग्रेसमधील आणखी एक वाद सर्वांच्या समोर आला. पण बाळासाहेब थोरात यांची नाराजगी दूर करण्यात काँग्रेसला थोडेफार यश आल्याचे दिसून येत आहे.

सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन केल्यानंतर भाजपकडून अप्रत्यक्षपणे त्यांना पक्षात येण्याची ऑफर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून देण्यात आली. पण आपण अपक्ष राहूनच कायम काम करणार असल्याचे सत्यजित तांबे यांच्याकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी भर सभेमध्ये सत्यजितला पुन्हा पक्षात येण्याचे आवाहन केले. सत्यजितच पक्ष विरूद्ध अपक्ष किती चालतंय हे बघू. तुझ्याशिवाय कॉंग्रेसला आणि कॉंग्रेसमधील तुझ्या टीमला कसं करमणार असं म्हणत त्यांच्या पुनरागमनाचे संकेत दिले होते.

- Advertisement -

हेही वाचा – पहाटेचा शपथविधी आठवल्यावर फडणवीस दचकून जागे होतात – राऊत

दरम्यान, आता सत्यजित तांबे यांच्याकडून एक सूचक ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी एक चारोळी पोस्ट केली आहे. या ट्विटमध्ये सत्यजित तांबे यांनी लिहिले आहे की, “उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…नजरेत सदा नवी दिशा असावी । घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही… क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी ।” सत्यजित तांबे यांनी केलेल्या या ट्विटमुळे अनेक उलट सुलट चर्चा करण्यात येत आहेत. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, या ओळीमुळे सत्यजित तांबे हे पुन्हा काँग्रेस पक्षात परतणार नाही, असेच म्हंटले जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, या ट्विटनंतर सत्यजित खरंच अपक्ष राहून काम करतात की, भाजपमध्ये जातात हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे. तर काँग्रेस पुन्हा एकदा सत्यजित तांबे यांना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करतात की नाही हे पाहावे लागणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण पदवीधर मतदारसंघात भाजपला फक्त एकाच जागेवर विजय मिळविता आला आहे. त्यामुळे भाजपकडून तांबे पिता-पुत्रांना गळाला लावण्याचे आणखी प्रयत्न करण्यात येतील, ही शक्यता देखील नाकारता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -