घरराजकारणईडी, सीबीआयने आमच्यावरही दबाव आणला, पण आम्ही पक्ष सोडला नाही - संजय...

ईडी, सीबीआयने आमच्यावरही दबाव आणला, पण आम्ही पक्ष सोडला नाही – संजय राऊत

Subscribe

काही लोक दबावात आले आहेत. तसेच अनेक आमदारांना धमक्या देण्यात आल्या. त्यांना मारहाणही करण्यात आली, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे. 

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and Urban Development Minister Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. त्यांच्या बंडाचे नेमके कारण हे अद्याप समोर आले नाही. मात्र, ईडी आणि सीबीआयच्या दबावामुळे शिंदे यांनी हे पाऊल उचलल्याचा दावा खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, ईडी (ED), सीबीआयने (CBI) आमच्यावरही दबाव आणला. मात्र, आम्ही पक्ष सोडला नाही. पक्षासोबत गद्दारी केली नाही. एकनाथ शिंदे यांची अडचण मला माहिती. काही लोक दबावात आले आहेत. तसेच अनेक आमदारांना धमक्या देण्यात आल्या. त्यांना मारहाणही करण्यात आली, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

राऊत म्हणाले की,  गुजरात पोलिसांच्या केंद्रीय पोलिसांच्या गराड्यात सर्व आमदारांना ठेवण्यात आले आहे. अनेक आमदारांनी तिथून सुटण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर दहशत आणि खुनी हल्ले झाल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. काही आमदारांनी कळवले आहे की आमच्या जिवाला धोका आहे. येथे आमची हत्याही होऊ शकते. अशाप्रकारचे वातावरण का तयार केले जात आहे. मला माहिती नाही. पण यातूनही शिवसेना बाहेर पडेल. शिवसेनेचे संघटन यातून पुन्हा एकदा उभे राहिल. कुणी कितीही म्हणत असले तरी संघटनेला कुठेही तडा गेलेला नाही. संध्याकाळी पुन्हा बैठक आहे. अनेक आमदारांनी आमच्याशी विविध मार्गांनी संपर्क साधला, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -