Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण आमची मतं परत द्या, नाहीतर तोच कांदा तुमच्या तोंडावर मारु; गुलाबराव पाटलांचा...

आमची मतं परत द्या, नाहीतर तोच कांदा तुमच्या तोंडावर मारु; गुलाबराव पाटलांचा राऊतांवर पलटवार

Subscribe

गुलाबराव पाटील म्हणाले की, आधी आम्ही दिलेली मतं परत करा आणि मग गुलाबराव पाटलांवर टीका करा. नाहीतर तोच कांदा तुमच्या तोंडावर हाणून मारु, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी राऊत यांना दिला आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मालेगावमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेदरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे ( शिंदे गट) नेते सुहास कांदे आणि गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ज्या गद्दारांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली, त्या प्रत्येकाला खोक्याखाली चिरडण्याचे आवाहन राऊतांनी केले. तसेच, आपल्याला त्या गुलाबराव पाटील यांना रस्त्यावर फेकायचे आहे, असे म्हणत राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर वार केला. आता त्यांच्या याच  वाराला उत्तर देत गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे.

संजय राऊंतासारख्या माणसाला माझ्यावर टीका करावी लागत आहे. म्हणजे मी छोटा माणूस नाही. कारण दगडं त्याच झाडाला मारले जातात, ज्या झाडाला फळं आहेत. याचाच अर्थ असा की, संजय राऊत यांना माहिती आहे की, मला फळं लागली आहेत, असे म्हणताना गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांचा मिंधे असा उल्लेख केला. पाटील म्हणाले की, आधी आम्ही दिलेली मतं परत करा आणि मग गुलाबराव पाटलांवर टीका करा. नाहीतर तोच कांदा तुमच्या तोंडावर हाणून मारु, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी राऊत यांना दिला आहे.

 ‘त्या’ प्रत्येकाला खोक्याखाली चिरडा

- Advertisement -

मालेगाव येथील सभेत बोलताना, संजय राऊत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कांद्याला भाव नाही, कांदा रस्त्यावर फेकला जात आहे. पण आपल्याला त्या सुहास कांदेला रस्त्यावर फेकायचे आहे आणि कांद्याला भाव मिळवून द्यायचा आहे. तसेच, त्या गुलाबराव पाटील यांनादेखील रस्त्यावर फेकायचे आहे. ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली त्या प्रत्येकाला त्याच खोक्याखाली चिरडायचे आहे, असे राऊत म्हणाले होते.

( हेही वाचा: मला मतांसाठी कोणाला लोणी लावायला आवडत नाही; नितिन गडकरींचे निवडणूक न लढवण्याचे संकेत )

आम्ही पण सावरकर भक्त – उद्धव ठाकरे

- Advertisement -

या सभेदरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आम्ही सावरकर भक्त असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधींना जाहीर सांगतो की सावरकर यांच्यावर टीका सहन करणार नाही. सावरकरांच्या वाड्यात लहान असताना गेलो आहे. सावरकरांचे वडील हे टिळक भक्त होते. 14 वर्षे त्यांनी छळ सोसला. आपण देशाची लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आहोत, फाटे फुटू देऊ नका. अन्यथा देश हा हुकुमशाहीकडे जाईल, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे.

- Advertisment -