घरराजकारणफडणवीसांचे वेषांतराचे नाट्य, शिवसेनेचा फडणवीसांवर रोखठोकमधून हल्लाबोल

फडणवीसांचे वेषांतराचे नाट्य, शिवसेनेचा फडणवीसांवर रोखठोकमधून हल्लाबोल

Subscribe

महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकारचा नवा घरोबा तयार झाला असून. कशा प्रकारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार स्थपान करण्यासाठी रणनीती आखली? , कशा गुप्तभेटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये व्हायच्या?, याबाबतचा भांडाफोड काही दिवासंपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच एका मुलाखती दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलाय. मात्र हाच दुवा पकडत शिवसेनेने सामना रोखठोकमधून शिंदे- फडणवीस यांच्यावर निशाणा साधालाय.

“फडणवीस महाराष्ट्राला लाभलेले नवे हरुन-अल-रशीद”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह जे बंड केलं, त्याच्याशी भाजपचा संबंध नाही असे सांगणारे आता भाजपवालेच उघडे पडले. ‘या सर्व काळात देवेंद्र फडणवीस हे रात्री-अपरात्री वेषांतर करून शिंदे यांना भेटण्यासाठी बाहेर पडत.’’ काळा कोट, काळा चष्मा, फेल्ट हॅट असे जेम्स बॉण्ड किंवा शेरलॉक होम्स पद्धतीचे वेषांतर करून ते बाहेर पडत असावेत. त्यांच्या तोंडात चिरूट वगैरे आणि हातात नक्षीदार काठी होती काय? याचाही खुलासा व्हायला हवा. पंतप्रधान मोदी हे कपड्यांचे व रूप पालटून फिरण्याचे शौकीन आहेत, पण फडणवीसही तेच करू लागले. त्यांनी शिंदे यांना भेटायला जाताना काही वेळेस नकली दाढी-मिश्याही लावल्या असाव्यात. हे सर्व रहस्य त्यांच्या पत्नी सौ. अमृता यांनी फोडले नसते तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती. सौ. फडणवीस यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. असं वक्तव्य करत शिवसेनेने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय.

- Advertisement -
“महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यासाठी वेषांतर केलेल कपडे संग्रहालयात ठेवा”

मोदी यांचे अनुकरण त्यांच्या लोकांनी किती करावे ते पहा. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सत्तांतर घडवून आणण्यासाठी जे वेषांतर केले ते सर्व कपडे व ऐवज पुढील पिढीसाठी एखाद्या संग्रहालयातच ठेवले पाहिजेत. असा टोमणा हाणत बगदादचा खलिफा हरुन-अल-रशीद अनेकदा वेषांतर करून त्याच्या राज्यात रात्रीचा फिरत असे, पण तो का फिरत असे? आपल्या राज्याचे प्रशासन, सरदार प्रजेशी नीट वागत आहेत ना? प्रजेला काय समस्या आहेत? आपले राज्य नीट चालले आहे ना? राज्यकारभार करताना आपल्याला कोणी फसवत तर नाही ना? हे जाणून घेण्यासाठी; पण नागपूरचे व ठाण्याचे हरुन-अल-रशीद वेषांतर करून भेटत होते ते बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे कारस्थान तडीस नेण्यासाठी. असा आरोप करण्यात आला.हरुन-अल-रशीद हा उत्तम खलिफा, पण बगदादला जसा चांगला राजा होता तसा चोर व लुटारूंचा सुळसुळाट होता. ‘थीफ ऑफ बगदाद’ किंवा ‘अलिबाबा चाळीस चोर’ या सर्व कथा आणि दंतकथा बगदादशी संबंधित आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला लाभलेले नवे हरुन-अल-रशीद नक्की काय करणार? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.


हे ही वाचा – शिवसेना आणि शिंदे गटाच्या आमदारांना नोटिसा, 7 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -