घरराजकारणश्रीकांत शिंदेंच्या नोकरांना सुरक्षा; मग संजय राऊतांना का नाही? सुनिल राऊतांचा सवाल

श्रीकांत शिंदेंच्या नोकरांना सुरक्षा; मग संजय राऊतांना का नाही? सुनिल राऊतांचा सवाल

Subscribe

श्रीकांत शिंदे यांच्या ड्रायव्हरला, भाजी आणणा-यांनाही सुरक्षा आहे. मग संजय राऊतांना का नाही? असा सवाल आमदार सुनिल राऊत यांनी राज्य सरकारला केला आहे.

संजय राऊत यांना मागच्या अनेक महिन्यांपासून धमक्या येत आहेत. त्यांना आलेल्या धमक्यांना राज्य सरकार गांभीर्याने घेते असं वाटतं नाही. श्रीकांत शिंदे यांच्या ड्रायव्हरला, भाजी आणणा-यांनाही सुरक्षा आहे. मग संजय राऊतांना का नाही? असा सवाल आमदार सुनिल राऊत यांनी राज्य सरकारला केला आहे. दारुच्या नशेत कोणीतरी मेसेज केला असेल, राऊत चर्चेत राहण्यासाठी असं करतात, या सत्ताधाऱ्यांकडून आलेल्या वक्तव्यांचादेखील आमदार सुनिल राऊत यांनी समाचार घेतला आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना लाॅरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याचा धमकीचा मेसेज आला होता. यावर प्रतिक्रिया देताना, आमदार सुनिल राऊत यांनी सरकारवर आरोप करत, हा सवाल केला आहे.

- Advertisement -

सुनिल राऊत काय म्हणाले?

सुनिल राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, काल संजय राऊत यांना लाॅरेन्स बिश्नोई याच्याकडून व्हाॅट्सअॅप मेसेज आला होता. AK 47 याने दिल्लीला किंवा कुठेही मुसावालाला ज्याप्रकारे मारलं तसं उडवू अशी धमकी संजय राऊत यांना आली होती. या संदर्भात कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

राऊतांनाच कसे मेसेज?

संजय राऊत यांना दारुच्या नशेत कुणीतरी मेसेज केल्याचे म्हटले जात आहे. यावरुन सुनिल राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणालेकी, दारुच्या नशेत फक्त संजय राऊत यांनाच कसे मेसेज येतात. महाराष्ट्रात भरपूर लोक आहेत भरपूर नेते आहेत पण. मग दारुच्या नशेत संजय राऊत यांनाच धमकीचा मेसेज कसा काय येतो, असे सुनिल राऊत म्हणाले.

- Advertisement -

( हेही वाचा: मी गृहमंत्री झाल्याने अनेकांची अडचण; सुप्रिया सुळेंच्या टीकाला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर)

सुनिल राऊत आक्रमक

त्या बंडखोर 40 आमदारांना दोन दोन गाड्या मागे पुढे ठेवल्या आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे काही ड्रायव्हर आणि भाजी आणणा-यांनाही सुरक्षा आहेत. राऊतांना मागच्या सहा महिन्यांपासून धमक्या येत आहेत, असा आणखी एक खळबळजनक दावा सुनिल राऊत यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -