घरराजकारणराजीव गांधींचा स्मृतीदिन; सिद्धरामय्या म्हणाले, भाजपचा एकही नेता...

राजीव गांधींचा स्मृतीदिन; सिद्धरामय्या म्हणाले, भाजपचा एकही नेता…

Subscribe

 

कर्नाटकः भाजपचा एकही नेता दहशतावादी हल्ल्यात मारला गेला नाही. कॉंग्रेसचे दोन्ही जेष्ठ नेते दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आहेत, असा निशाणा कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर साधला.

- Advertisement -

राजीव गांधी यांचा आज स्मृतीदिन आहे. यानिमित्त कर्नाटक येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाषणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजपवाले म्हणतात कॉंग्रेसने दहशतवादाला पाठबळ दिलं. पण आमचे दोन्ही दिग्गज नेते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी दहशतवादी हलल्यात मारले गेले आहेत. आजपर्यंत भाजपचा एकही नेता दहशतवादी हलल्यात मारला गेला नाही, असे सिद्धरामय्या यांनी भाजपला सुनावले.

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटकमधील कॉंग्रेसच्या विजयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. कॉंग्रेसने १३५ पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला. तरीही मी आनंदीत नाही. माझा किंवा सिद्धरामय्या यांच्या घरी कार्यकर्त्यांनी येऊ नये. आमचे पुढचे लक्ष्य लोकसभा निवडणुका आहे. या निवडणुकांना आपल्याला चांगल्या पद्धतीने सामोरे जायचे आहे, असे आवाहन डी. के. शिवकुमार यांनी केले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये १३५ जागा जिंकत पूर्ण बहुमत मिळवणार्‍या काँग्रेसने सत्ता स्थापन केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोन्ही नेत्यांसोबतच यावेळी आणखी ८ मंत्र्यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांसह विविध विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यावेळी सर्व नेत्यांनी एकत्र विरोधकांच्या एकजुटीचे जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

- Advertisement -

कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. २२४ सदस्यांच्या विधानसभेत १३५ जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. १३ मे रोजी लागलेल्या निकालात विधानसभा निवडणुकांमध्ये बहुमत मिळविल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाचा पेच न सुटल्याने काँग्रेसने अद्याप येथे सत्ता स्थापनेसाठी दावा केला नव्हता. अखेर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा पेच सुटला. सोनिया गांधी यांच्या विनंतीनंतर डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झाले, तर सिद्धरामय्या यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -