Eco friendly bappa Competition
घर राजकारण कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ Karnataka CM : सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री; डी.के. शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान

Karnataka CM : सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री; डी.के. शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान

Subscribe

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांनी आज (शनिवार, ता. 20 मे) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Karnataka Assembly election 2023 : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांनी आज (शनिवार, ता. 20 मे) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी 8 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

हेही वाचा – Devendra Fadnavis Vs Raj Thackeray : असं काय म्हणाले फडणवीस ज्यामुळे राज ठाकरे संतापले, म्हणाले…

- Advertisement -

काँग्रेसने कर्नाटकमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 224 सदस्यांच्या विधानसभेत 135 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. काँग्रेसने सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वात येथे सरकार स्थापन केले आहे. या शपथविधी सोहळ्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, जम्मू-काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती, यांनी बेंगळुरू येथे नवनिर्वाचित कर्नाटक सरकारच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. विरोधी पक्षातील नेत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने यावेळी विरोधकांची एकजूट दिसून आली.

या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील मित्रपक्ष म्हणून काँग्रेसकडून विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना शपथविधीसाठी आमंत्रण देण्यात आले होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वत: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन निमंत्रण दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. परंतु उद्धव ठाकरे शपथविधीला हजर राहू शकले नाही. त्यांच्या अनुपस्थितीचं नेमकं कारण मात्र समजू शकलेले नाही. मात्र ठाकरे गटाकडून शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी या सोहळ्याला उपस्थित होत्या.

- Advertisement -

मागील आठवड्यात शनिवारी (ता. 13 मे) कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी काँग्रेस हायकमांडने तीन ज्येष्ठ नेत्यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करत त्यांच्याकडून राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचे मत जाणून घेतले. त्यानंतर सिद्धरमय्या यांची मुख्यमंत्रीपदी तर डी. के. शिवकुमार यांची उपमुख्यमंत्री पदी नावे घोषित करण्यात आली. त्यामुळे चार ते पाच दिवसानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या नावांवर शिक्कामोर्तब करत राज्यातील सत्ता स्थापनेसाठी आजचा मुहूर्त निश्चित करण्यात आला.

या आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ..
डॉ. जी परमेश्वरा, केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज आणि एमबी पाटील यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून यावेळी शपथ घेतली. तर सतीश जारकीहोली, प्रियांक खरगे (मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र), रामलिंगा रेड्डी आणि जमीर अहमद खान यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.

 

- Advertisment -