बंडखोर नेत्यांबाबत सरकारच्या विविध निर्णयांचा खुलासा करा; राज्यपालांचे मुख्य सचिवांना निर्देश

state government Disclose various decisions regarding rebel leaders governor bhagat singh koshyari Order to Chief Secretary

शिवसेनेत बंड झाल्यानंतर दोन दिवसांत राज्य सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना पत्र दिले असून याबाबत खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. तर विधापरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारने असे अनेक निर्णय घेतले आहेत की जे वेबसाइटवर प्रसिद्ध केले नाहीत. त्यामुळे या निर्णयांचीही चौकशी करण्याची मागणीही दरेकर यांनी केली आहे.

२२, २३ आणि २४ जून या दिवशी राज्य शासनाने मोठ्या संख्येने शासन निर्णय, परिपत्रके जारी केली होती. सुमारे १६० पेक्षा जास्त निर्णयांचे आदेश शासनाने अवघ्या तीन दिवसात जारी केले होते. सरकार जाण्याच्या भितीने घाईघाईत हे निर्णय जारी केले असल्याबाबत प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना २४ जून रोजी तक्रार केली होती. हे सर्व निर्णय संशयास्पदरित्या केले असल्याचा आरोप दरेकर यांनी केला होता.

मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान रिकामे केले म्हणजे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याचा त्यांचा मानस असल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थिती एकढ्या मोठ्या प्रमाणार शासन निर्णय जारी करणे म्हणजे जनतेच्या पैशाचा गैरवापर होण्याची शक्यता, दरेकर यांनी व्यक्त केली होती. दरेकर यांच्या या तक्रारीची दाखल घेऊन राज्यपालांनी याबाबत कारणमीमांसा स्पष्ट करण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत.


दगाफटका केल्यानंतरही मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांना परत येण्याचं आवाहन – आदित्य ठाकरे