घरराजकारणदेवेंद्र फडणवीसांच्या ट्विटने नव्या चर्चांना उधाण; सरकार जाणार की राहणार?

देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटने नव्या चर्चांना उधाण; सरकार जाणार की राहणार?

Subscribe

कार्यालयातील उर्वरित कामे पूर्ण करण्याचं मिशन हाती घेण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधीच्या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या ट्विटने राजकीय वर्तुळात आता भुवया उंचावल्या आहेत.

मागच्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत होत्या. अजित पवार राष्ट्रवादी काॅंग्रेस सोडून भाजपात जातील अशा चर्चा होत्या. परंतु त्यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली. माझ्याबाबतीत अफवा पसरवल्या जात आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे उठणाऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटने चर्चांचा धुरळा उठला आहे. आता फडणवीस यांच्या ट्विटने सरकार जाणार की राहणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. ( Supreme court Decision on Maharashtra political crisis Deputy CM Devendra Fadnavis tweet sparks new discussions Will the government survive or not  )

नेमकं प्रकरण काय?

कार्यालयातील उर्वरित कामे पूर्ण करण्याचं मिशन हाती घेण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधीच्या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या ट्विटने राजकीय वर्तुळात आता भुवया उंचावल्या आहेत. फडणवीसांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय आहे. या संदर्भात आता चर्चांना उधाण आलं आहे.

- Advertisement -

फडणवीसांच ट्वीट काय?

ऑफिस वर्क, ह‌‌ॅशटॅग क्लिअरिंग्स पेंडिग्स, कार्यालयीन कामकाज, असं ट्वीट केलं आहे. कार्यालयीन प्रलंबित कामकाज मार्गी लावताना असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलवर फाईल्स दिसत आहेत. या सर्व फाईल्सवर फडणवीस सह्या करताना दिसत आहेत. आता त्यांनी काम मार्गी लावण्याचं ट्वीट केल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

- Advertisement -

( हेही वाचा श्रीसदस्यांचा मृत्यू उष्माघाताने की चेंगराचेंगरीत? जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारला सवाल )

सरकार जाणार की राहणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटचे आता अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता यावर लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने जर 16 आमदारांना अपात्र ठरवलं तर राज्यातील सरकार कोसळणार. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्वीटने चर्चांना उधाण आलं आहे. सरकार पडणार याची कल्पना असल्याने देवेंद्र फडणवीस हे फायली मार्गी लावत असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -