घरराजकारणजशी स्क्रीप्ट आली तशी वाचली असेल..., उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

जशी स्क्रीप्ट आली तशी वाचली असेल…, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

Subscribe

आमचे केवळ हाय- हॅलो एवढचं बोलणं झाल्याचं म्हटलं आहे. फडणवीसांशी बोलणं झाल्यानंतर आता मोदींविरोधात तुम्ही सौम्य व्हाल, या प्रश्नावर त्यांनी आता कोणाला हाय -हॅलो करणेही पाप झाले आहे, असे उत्तर दिले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्क, शिवतीर्थ येथे सभा घेतली होती. या सभेदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात अनेक वक्तव्ये केली. आता यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे. गेली 18 वर्षे तीच- तीच कॅसेट घासून -पुसून सुरु आहे. तसेच, राज ठाकरेंनी माहिमच्या दर्ग्यााबाबत सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवरुन आणि तत्काळ झालेल्या कारवाईवरुनदेखील उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना डिवचले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांना जशी स्क्रीप्ट आली असेल त्यांनी तशी वाचली असेल. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी ही टोलेबाजी केली आहे.

( हेही वाचा :सभेनंतर राज ठाकरेंविरोधात पुण्यात तक्रार दाखल; काय आहे प्रकरण? )

- Advertisement -

राज ठाकरे म्हणजे ‘लगे रहो मुन्नाभाई’

राज ठाकरे यांनी बुधवारी केलेल्या सभेत माहिमच्या खाडीतील अनधिकृत दर्ग्यावर कारवाई करण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर त्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली. यावर बोलताना, उद्धव ठाकरे यांनी त्यांना आलेली स्क्रीप्ट त्यांनी जशीच्या तशी वाचली असेल, असा टोला लगावला.

राज ठाकरे यांनी बुधवारच्या सभेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यावर प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला आहे. मागची 18 वर्षे त्यांची ही कॅसेट घासून- पुसून सुरु आहे. मी मागच्या वर्षी 14 मे ला बांद्रा- कुर्ला काॅम्पेक्स येथे घेतलेल्या सभेमध्ये एका चित्रपटाचा दाखल दिला होता, आता तेच सुरु आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी 14 मे ला झालेल्या भाषणात राज ठाकरेंचे व्यक्तीमत्त्व म्हणजे ‘लगे रहो मुन्नाभाई’ सारखे आहे असे म्हटले होते. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, इथे एक खरा मुन्नाभाई आहे जो स्वत:ला बाळासाहेब ठाकरे समजतो.

आता हाय – हॅलो म्हणणंही पाप झालंय

उद्धव ठाकरे आज, गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाकरे यांचे जुने सहकारी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करताना दिसले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. याच चर्चांवर पूर्णविराम देत उद्धव ठाकरे यांनी आमचे केवळ हाय- हॅलो एवढचं बोलणं झाल्याचं म्हटलं आहे. फडणवीसांशी बोलणं झाल्यानंतर आता मोदींविरोधात तुम्ही सौम्य व्हाल, या प्रश्नावर त्यांनी आता कोणाला हाय -हॅलो करणेही पाप झाले आहे, असे उत्तर दिले. तसेच,  मराठी भाषा भवन बांधण्याचा निर्णय आमच्या काळात झाला. आताच्या सरकारने एक वीटही रचली नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -