घर राजकारण 'तुम्हाला पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'; ठाकरे गटाची गडकरींना मोठी ऑफर

‘तुम्हाला पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’; ठाकरे गटाची गडकरींना मोठी ऑफर

Subscribe

पंतप्रधान पदाचे दावेदार होतील म्हणून नितीन गडकरींसाठी हा कट रचल्याचं देखील विनायक राऊत म्हणाले आहेत. परंतु, नितीन गडकरी यांना संपवण्याचा हा कट महाराष्ट्र उधळून लावेल. तुम्ही कशाला घाबरता, तुम्ही फक्त आवाज द्या, इंडियामध्ये या.. तुम्हाला पंतप्रधान केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा शब्द उद्धव ठाकरे सुद्धा देतील, अशी ऑफरच विनायक राऊत यांनी गडकरींना दिली.

कॅगच्या अहवालात मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे ताशेरे ओढण्यात आले होते. या भ्रष्टाचारात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याचंही नाव आहे. यावर आता राज्यातील विरोधी पक्षांतील नेत्यांच्याही प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी नितीन गडकरी यांना मोठी ऑफर दिली आहे. ( Thackeray group leader Vinayak Raut big offer to Nitin Gadkari )

विनायक राऊत म्हणाले की, देशातील नवीन प्रकल्पाचा कॅगने रिपोर्ट दिला होता. या रिपोर्टमध्ये नितीन गडकरी यांच्या खात्यात घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. भाजपच्या बेशरम वरिष्ठ नेतृत्त्वाने असा नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत विनायक राऊत यांनी त्यांनीच हे घोटाळे उघड केल्याचा आरोप केला. तसंच, पंतप्रधान पदाचे दावेदार होतील म्हणून नितीन गडकरींसाठी हा कट रचल्याचं देखील विनायक राऊत म्हणाले आहेत. परंतु, नितीन गडकरी यांना संपवण्याचा हा कट महाराष्ट्र उधळून लावेल. तुम्ही कशाला घाबरता, तुम्ही फक्त आवाज द्या, इंडियामध्ये या.. तुम्हाला पंतप्रधान केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा शब्द उद्धव ठाकरे सुद्धा देतील, अशी ऑफरच विनायक राऊत यांनी गडकरींना दिली.

- Advertisement -

तसंच, अख्ख्या देशात भ्रष्टाचारी राजवट सुरू आहे. कोरोनाच्या माध्यमातून पीएम केअर फंडात किती हजार कोटींचा निधी जमा झाला. देशातल्या, महाराष्ट्रातल्या लोकांना त्यात पैसे दिले, पण त्याचा हिशोब द्यायचा नाही, अशी टीका देखील राऊत यांनी मोदींवर केली.

दादा- चायनिज माल 

नितीन गडकरींच्या भाजपच्या दुकानावर जुने ग्राहक दिसत नसल्याच्या विधानावर विनायक राऊत यांना प्रतिक्रिया दिली आहे. नितीन गडकरी खरंच बोलले, आमचं दुकान चांगलच चाललं आहे. भाजपचं दुकानही सध्या तेजीत आहे, पण दुकानामध्ये पूर्णपणे चायनीज माल आहे, दादा चायनीज, गद्दार चायनीज, चार दिवस चालतील आणि बंद होतील टीका विनायक राऊत यांनी अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंवरही टीका केली आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: CWC : काँग्रेस वर्किंग कमिटीची घोषणा; अशोक चव्हण, प्रणिती शिंदेंसह महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांचा समावेश )

- Advertisment -