घरराजकारणराज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य : राजभवनावर जाणारा राष्ट्रवादीचा मोर्चा पोलिसांनी अडवला

राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य : राजभवनावर जाणारा राष्ट्रवादीचा मोर्चा पोलिसांनी अडवला

Subscribe

ठाणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राजभवनावर मोर्चा नेण्यात येत होता. मात्र ठाणे पोलिसांनी त्यांच्या बस अडवून जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, नजीब मुल्ला यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. पण गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात केले होते. त्यावर शिवसेना-भाजपासह सर्व पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली होती. यानंतर, मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याची सारवासारव राज्यपालांनी केली होती.

- Advertisement -

मात्र, राष्ट्रवादीने राज्यपालांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी ठाण्यातून थेट राजभवनावर मोर्चा नेण्याता निर्धार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बसमधून मुंबईच्या दिशेने निघाले होते. परंतु, पोलिसांनी या सर्व गाड्या आनंदनगर टोलनाका येथे अडविल्या. जितेंद्र आव्हाडांनी कार्यकर्त्यांसह घोषणबाजी करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना व इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं हे आंदोलन अवघ्या अर्ध्या तासात गुंडाळले गेले.

ही पोलिसांची जबरदस्ती आहे. हा आंदोलन दडपण्याचा प्रकार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रबद्दल प्रेम नाही. हा आमच्या अस्मितेला लागलेला धक्का आहे. राज्यपाल महाराष्ट्रातील जनतेमध्ये दुही निर्माण करत आहेत, असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -