सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल, निर्णयाचे स्वागतच असेल; ठाकरे गटाचा विश्वास

ठाकरे गटाकडून निर्णय आमच्याच बाजूने लागेल आणि जो निर्णय असेल त्याचं स्वागतच असेल, असं सांगण्यात आलं आहे.

Anil Desai
Anil Desai

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्या, 12 मे ला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता निर्णय कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यातच आता ठाकरे आणि शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. यात ठाकरे गटाकडून निर्णय आमच्याच बाजूने लागेल आणि जो निर्णय असेल त्याचं स्वागतच असेल, असं सांगण्यात आलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल भारताची लोकशाही समृद्ध करणारा असेल. हा निकाल आमच्याच बाजूने लागेल, अशी आम्हाला खात्री आहे. या निर्णयाची संपूर्ण जग वाट पाहत आहे. याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. सत्तासंघर्षाच्या प्रत्येक सुनावणीला हजर होतो. या निकालावेळीही दिल्लीत असेन. जी जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी मी पार पाडेन. सर्वोच्च न्यायालया भारतीय संविधानाला धरुन आणि भारताची लोकशाही समृद्ध करणारा निकाल देईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. संविधानात ज्या तरतूदी आहेत. त्या तरतुदींप्रमाणेच निर्णय ते देतील, अशी खात्री आहे. न्यायालया जो निर्णय देईल, त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करु, असं अनिल देसाई यांनी म्हटलं आहे. (The verdict of the Supreme Court will be in our favor the decision will be welcome Faith of the Thackeray group Anil Desai )

दरम्यान, आधी निकाल येऊ द्या मागच सर्वांनी आपलं ज्ञान पाजळावं. सर्वजण सर्वोच्च न्यायालयाचे जज असल्यासारखे प्रतिक्रिया देत आहेत. निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल. कारण आम्ही पात्र झालो तर ते अपात्र होतील, असं शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

( हेही वाचा: नाना पटोले यांच्यातील वादावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; म्हणाले… )

उद्या, 11 मेला निकाल

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयातील निकाल आपल्या बाजूने लागेल, असा विश्वास शिंदे गट तसेच ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. सुरुवातीपासूनच या प्रकरणाच्या प्रक्रियेचा भाग असलेले शिवसेना ठाकरे गटाचने खासदार अनिल देसाई यांनी याबाबत भाष्य केलं आहे.