Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण महापालिकेतील भ्रष्टाचारातील कंपन्यांची होणार चौकशी; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

महापालिकेतील भ्रष्टाचारातील कंपन्यांची होणार चौकशी; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

Subscribe

कंपन्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शनिवारी, 25 मार्चला शेवटचा दिवस होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेशी संबंधित भ्रष्टाचाराची मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे म्हटले होते. त्यानुसार, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचारात गुंतलेल्या काही कंपन्यांच्या चौकशीची घोषणा केली आहे. विधानसभेत भाजप आमदार अमित साटम यांनी मुंबई महापालिकेशी संबंधित काही कंपन्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून, या कंपन्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुंबईचं महत्त्व कमी होणार नाही

गेल्या काही वर्षात मुंबईचा रखडलेला विकास आणि खड्ड्यांची मुंबई ही ओळख पुसून मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून द्यायचे आहे. बाहेर गेलेला मुंबईकर परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि यापुढेही राहील. मुंबईचं महत्त्व कमी होणार नाही. आम्ही ते कमी होऊ देणार नाही, असे सांगत वर्षानुवर्षे रखडलेला पुनर्विकासाचा मार्गही मोकळा केल्यामुळे सेस बिल्डिंगमधील रहिवाशांना आता चांगली आणि हक्काची घरं मिळणार आहेत. मुंबईचे भूमिपुत्र असलेल्या कोळी बांधवांनाही त्यांचे कोळीवाडे आणि स्वतंत्र गावठाण यांचे सर्वेक्षण आणि सीमांकन करून हक्काची घरं मिळतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई, मुंबई महानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती

- Advertisement -

मुंबईसारख्या महानगरामध्ये दळणवळणानंतर घरांचा विषयही जिव्हाळ्याचा आहे. आमचं सरकार आल्यानंतर केवळ मुंबईच नाही तर मुंबई महानगर क्षेत्रातदेखील सिडको, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती करतो आहोत, असे सांगून आजच्या पिढीला, तरुणांना काम करणारे सरकार हवे आहे आणि आम्ही ‘परफॉर्म’ करत आहोत. लोकांच्या मनातलं हे सरकार सर्वसामान्य लोकांसाठी अशीच दमदारपणे वाटचाल करीत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

( हेही वाचा: राहुल गांधींचे सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य; आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले… )

बळीराजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे

- Advertisement -

राज्यातील बळीराजावर संकट आले असून, बळीराजाच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे. अडचणीच्या काळात मदतीसाठी मागेपुढे बघणारे आम्ही नाही. त्यामुळेच कांदा उत्पादकांपासून अवकाळीग्रस्तांपर्यंत सगळ्यांना या सरकारवर विश्वास आहे. सरकार त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisment -