‘माझ्याच लोकांनी दगा दिला’; मुख्यमंत्र्यांच हे विधान मन हेलावून टाकणारं-संजय राऊत

'My own people betrayed me'; This statement of the Chief Minister is heartbreaking - Sanjay Raut
'माझ्याच लोकांनी दगा दिला'; मुख्यमंत्र्यांच हे विधान मन हेलावून टाकणारं-संजय राऊत

राज्यातील सत्तानाट्य अगदी शिगेला पोहोचलंय. आज (29 जून) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बैठकीच्या शेवटी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. ‘माझ्याच लोकांनी मला दगा दिला’ असं भावनिक वक्तव्य करत मुख्यमंत्री मंत्रालयातून बाहरे आले. या संपूर्ण विषयासंदर्भात संजय राऊत यांनी देखील भाष्य केलंय. मुख्यमंत्र्यांच ते विधान मनं हेलावून टाकणारं आहे असं ते यावेळी म्हणाले. (‘My own people betrayed me’; This statement of the Chief Minister is heartbreaking – Sanjay Raut)

उद्धव ठाकरेंचं विधान मन हेलावून टाकणारं आहे – संजय राऊत

उद्धव ठाकरेंनी जे विधान केलं, ते हेलावून टाकणारं आहे. (माझ्याच काही लोकांनी दगा दिल्यामुळे ही अवस्था झाली) अस्वस्थ करणारं आहे. त्यांच्यासारखा एक सुसंस्कृत मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला. अजूनही ते मुख्यमंत्री आहेत. पण त्यांनी वेदना बोलून दाखवली. संजय राऊत पुढे बोलतात जे गुवाहाटीला बसलेत, त्यांना भयंकर राग येतो. संजय राऊतांना आवरा असं ते म्हणतात. मी जे बोलतो, ते उद्धव ठाकरे वेगळ्या शब्दात म्हणाले. माझ्याच लोकांनी मला दगा दिला हे डोळ्यात पाणी आणणारं त्यांचं विधान आहे.

स्वत:ला बंडखोर समजणाऱ्यांना हिशोब द्यावा लागेल – राऊत

उद्धव ठाकरेंनी काहींना मुलासारखं, काहींना मित्रासारखं, काहींना भावासारखं सांभाळलं. पण काहीही न पटणारी कारणं देऊन ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, ही वेदना महाराष्ट्राच्या मनात कायम राहील. दगाबाजीचा नवा अध्याय लिहिला गेला. औरंगजेबानं जशी संभाजी महाराजांची हत्या करवली, तशीच हत्या या लोकांनी लोकशाहीची केली. औरंगजेब जसा या मातीत गाडला गेला, त्याच पद्धतीने हे सगळे स्वत:ला बंडखोर समजतात, त्यांना वर गेल्यावर हिशोब द्यावा लागेल. हे तुम्ही खरंच राष्ट्रीय हेतूने केलं, की यामागे स्वार्थ होता वा अन्य काही होतं याची उत्तरं त्यांना द्यावी लागतील.


हे हि वाचा – माझ्याच लोकांनी मला फसवलं, सहकार्याबद्दल धन्यवाद, मुख्यमंत्री भावूक