घरराजकारणरयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था ठेवा; उदयनराजेंची जहरी टीका

रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था ठेवा; उदयनराजेंची जहरी टीका

Subscribe

रयत शिक्षण संस्थेवरून खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था कर अशी खोचक टीका उदयनराजे भोसले यांनी केली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या घटनेप्रमाणे या संस्थेच्या राज्याचा मुख्यमंत्री हा अध्यक्ष असला पाहिजे. मात्र तसं होत नाही. रयत शिक्षण संस्थेतील संचालकांचे रयतसाठी योगदान काय? असा प्रश्न रयतमध्ये चाललेल्या कारभारावर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कुटुंबियांनी उपस्थित करत आवाज उठवला पाहिजे. असही उदयनराजे म्हणाले आहेत.

रयत शिक्षण संस्थेची जागी दिली त्यावेळेस मी लहान होतो. त्यावेळी मला काही कळतं नव्हते. मात्र रयत शिक्षण संस्थाच संपूर्ण त्यांनी बळकावली. राज्याचा मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचा असो पण तो शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असतो. मग असं काय घडलं की त्यांत बदल केला. हे बदल करणारे कोण आहेत? लोकांना सवयचं लागली आहे, सगळं ओरबाडून घ्यायची, पण किती ओरबाडायचे? असा सवालही उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

ज्यांचं काही योगदान नाही अशांना तुम्ही संस्थेत घेतलं. मला नका घेऊ, मला करण्यासारखं भरपूर आहे. पण हे घेणार कोण? आम्ही दिलंय, यांनी काय दिलयं, यांनी काही दिलं नाही, पण ओरबाडलं आहे. अशी गंभीर टीकाही उदयनराजे यांनी केली आहे.

अलीकडे ज्यांना संस्थेत घेतलं त्यांच काय योगदान आहे त्यांनी काय केलं? काढा हे सर्व. मग रयतचं नाव बदलून टाका. रयत म्हणजे सर्वसामान्यांची संस्था. संख्या ज्याची जास्त ते लागू करा इथे. संख्या जास्त कोणाची आहे? पवार कुटुंबाचं. मग पवार शिक्षण संस्था नाव देऊन टाका. कर्मवीर भाऊरावांच्या कुटुंबाचा वारसा सांगता, मग त्यांनीही थोडं तरी बोललं पाहिजे. अशा शब्दात उदयराजे भोसले यांनी पवार कुटुंबियांवर हल्लाबोल केला आहे.


‘भारत जोडो’ यात्रेच्या धसक्याने भाजपाला ‘सर्वधर्मसमभाव’ची आठवण!; अतुल लोंढेंचा हल्लाबोल


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -