घरराजकारणमी मुख्यमंत्री पद सोडेन पण..., उद्धव ठाकरे यांनी मांडली भूमिका

मी मुख्यमंत्री पद सोडेन पण…, उद्धव ठाकरे यांनी मांडली भूमिका

Subscribe

उद्धव म्हणाले की,  जे आमदार गेलेत त्यांनी येऊन माझा राजीनामा घ्यावा आणि तो राज्यपालांना द्यावा. मी राजीनामा घेऊन जाऊ शकत नाही कारण मला कोरोना झाला आहे. ज्या शिवसैनिकाला वाटते मी पक्ष प्रमुख म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून नालायक आहे तर मी दोन्ही पदे सोडतो.

शिवसेना (shiv sena) नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते. राज्यात सत्तापरिवर्तन होणार का, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) राजीनामा देणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे (facebook live) जनतेसमोर येत आपली भूमिका मांडली. मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे. पण तुम्ही समोर येऊन मला राजीनामा (resignation) देण्यास सांगा. मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे मला कोणताही मोह नाही. तुम्ही बोलला की आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नको आहे तर मी आतापासून माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवतो. या समोर येऊन बसा मी राजीनामा देतो. मी राजीनाम्याचे पत्र तयार ठेवतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा – जन्मदात्री शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करू नका, उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्दे

- Advertisement -

उद्धव म्हणाले की,  जे आमदार गेले त्यांनी येऊन माझा राजीनामा (resignation) घ्यावा आणि तो राज्यपालांना द्यावा. मी राजीनामा घेऊन जाऊ शकत नाही कारण मला कोरोना झाला आहे. ज्या शिवसैनिकाला वाटते मी पक्ष प्रमुख म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून नालायक आहे तर मी दोन्ही पदे सोडतो. पण हे शिवसैनिकानेच सांगायला हवे. इतर कोणी हे सांगितले तर चालणार नाही. पण मी मुख्यमंत्री पद सोडले तर शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायला हवा. पण मला येऊन बोला किंवा तिकडून फोन करून बोला. तुम्ही मला स्पष्टपणे सांगा की तुम्हाला मी नको आहे, तर मी पद सोडेन. हे माझे नाटक नाही.

शिवसेना कधीही हिंदुत्वापासून दूर जाऊ शकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे असे म्हटले होते. पण आता असे अनेक जण म्हणतात की आताची शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही. मी असे काय केले की शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही, असाही सवाल त्यांनी केला. पण मधल्या काळात शिवसेनेने जे दिले ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिले हे पण लक्षात ठेवा, असा सल्लाही त्यांनी हिंदुत्वावरून आरोप करणाऱ्यांना दिला.

- Advertisement -

माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर आता काय करायचे. ते आता ते इथे नाहीत. त्यामुळे मी त्यांना माझे कसे बोलायचे. सुरत किंवा इतर कुठून का बोलायचे. एकाने जरी माझ्याविरोधात मतदान केले तर ते माझ्यासाठी लाजिरवाणे असेल. त्यामुळे माझ्याविरोधात अविश्वास ठराव नको. पण तुम्ही पुढे येऊन मला सांगा मी पद सोडेन, असेही उद्धव यांनी म्हटले.

एकंदरीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याचा चेंडू एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांकडे टोलवला आहे. त्यामुळे आता शिंदे आणि त्यांना पाठिंबा देणारे आमदार नक्की काय भूमिका घेतील याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -