घरराजकारणठाकरे गटाच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

ठाकरे गटाच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

Subscribe

उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे पक्षातील नेत्यांची, आमदारांची आणि खासदारांची तातडीची बैठक बोलवली आहे. दुपारी एक वाजता ही महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या तीन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात सलग सुनावणी सुरु होती. पण सत्तासंघर्षावर येत्या मंगळवारी (ता. 21 फेब्रुवारी) सुनावणी करण्यात येणार असल्याचे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. पण त्याआधीच निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे.

शुक्रवारी (ता. 17 फेब्रुवारी) संध्याकाळी निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले. ज्यामुळे राजकीय गोटात एकच खळबळ माजली. यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला संताप व्यक्त केला. यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगावर देखील निशाणा साधला. यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे पक्षातील नेत्यांची, आमदारांची आणि खासदारांची तातडीची बैठक बोलवली आहे. दुपारी एक वाजता ही महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisement -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे आता निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयाबाबत पुढील भूमिका घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी आमदार, खासदार आणि प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. यासाठी राज्यातील सर्व नेते मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आधीच आपले मत व्यक्त केले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांनी शेण खाल्लं असे वक्तव्य करत आयुक्तांवर हल्लाबोल केला.

दरम्यान, आज दुपारी होणाऱ्या या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित राहणार हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे. कारण यावरूनच ठाकरे गटात शिल्लक राहिलेले आमदार आणि खासदार हे या निर्णयानंतर देखील ठाकरे गटातच राहणार की, शिंदेंकडे जातात हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आता उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिंदे गटाला केंद्रात 4 मंत्रिपदं! 10 दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार?

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे आहे? याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर निर्णय आल्यानंतर घ्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने केली होती. पण सत्तासंघर्षावर येत्या मंगळवारी म्हणजेच 21 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाकडून निर्णय देण्यात येणार आहे. पण त्याआधीच निवडणूक आयुक्तांनी हा निर्णय दिल्याने शिंदे गटाला आनंद तर ठाकरे गटाला मोठा धक्का मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -