घरराजकारणठाकरे बंधुंचे राजकारण : उद्धव ठाकरेंचे सर्वसमावेशकतेकडे तर राज कट्टरतेच्या दिशेने?

ठाकरे बंधुंचे राजकारण : उद्धव ठाकरेंचे सर्वसमावेशकतेकडे तर राज कट्टरतेच्या दिशेने?

Subscribe

मुंबईः भाजपसोबत घेतलेली काडीमोड आणि पक्षांतर्गत झालेले वाद यामुळे उद्धव ठाकरे यांनी सर्वसमावेशक राजकारणाचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. म्हणूनच तर उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव येथील सभेचे बॅनर उर्दुतून लागले आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाविरोधात थेट आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे बंधुच्या या परस्पर विरोधी भूमिकेत मतदार नेमका कोणाला कौल देतील की याचा लाभ अन्यच कोणत्या पक्षाला होईल हे येणारा काळच ठरवेल. तसेच आजच्या सभेत उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधतील याची चर्चा सध्या सुरु आहे.

उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव येथे जाहिर सभा होणार आहे. या सभेचे उर्दुतील बॅनर सर्वत्र लागले आहेत. यावर आम्ही सर्वांना सोबत घेऊनच निवडणुका लढवणार आहोत, असे स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. महाविकास आघाडीला सोबत घेऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मवाळ भूमिका घेतली. त्याआधीही उद्धव ठाकरेंनी कोणत्या समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे मालेगाव येथील उद्धव ठाकरेंच्या सभेवर भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आरोप होत आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्व सोडले असल्याची टीका होत आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी थेट मुस्लिम विरोधी भूमिका घेतली आहे. मशिदीवरील भोंग्यांवरुन राज ठाकरे यांनी उठवलेले रान यामुळे पोलिसांची आणि तत्कालीन महाविकास आघाडीची चांगलीच डोकेदुखी झाली. मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर लाऊडस्पिकरवर हनुमान चालिसा लावली. काही दिवसांसाठी हा वाद चिघळला व नेहमीप्रमाणे काही दिवसांनी तो निवळला.

आता ठाकरे सरकार नाही. तरीही राज ठाकरे यांनी मुस्लिमविरोधी भूमिका कायम ठेवली आहे. आता तर माहिम समुद्रातील मजारचा मुद्दा राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात उपस्थित केला. या मजारी शेजारी असलेले बांधकाम महिन्याभरात तोडा अन्यथा तेथे शेजारी भव्य गणपती मंदिर उभारु, असा इशारा राज ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला. एका दिवसांत या मजारीशेजारी असलेले बांधकाम तोडण्यात आले. अन्य काही मशिदींची अनधिकृत बांधकामे तोडण्यास सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांची मुस्लिम विरोधी भूमिका तर उद्धव ठाकरे यांचे सर्वसमावेशक राजकारण असे युद्ध सध्या सुरु आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे मालेगावच्या सभेत कोणावर निशाणा साधतील हे बघावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -