घरराजकारणउद्धव ठाकरे 22 तारखेलाच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते, पण...

उद्धव ठाकरे 22 तारखेलाच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते, पण…

Subscribe

मुंबई : समोर येऊन सांगा, मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे. एवढेच नव्हे तर, शिवसेना पक्षप्रमुखपद सोडण्याचीही आपली तयारी आहे, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 जून रोजी बंडखोर आमदारांना केले. पण प्रत्यक्षात त्याच दिवशी ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते. परंतु महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी त्यांचे मन वळविले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपाने धक्का दिल्यानंतर महाविकास आघाडीतील सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यापाठोपाठ शिवसेनेचे अग्रणी नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवला आणि त्यांना शिवसेनेतील 21 आमदारांनी साथ दिली. हाच मोठा धक्का शिवसेनेला आणि ओघाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना होता. त्यामुळे त्यांनी 22 जून रोजी सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखले. त्यामुळे त्यांचे फेसबुक लाइव्ह देखील सायंकाळी पाचऐवजी साडेपाचच्या सुमारास झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली. पण शरद पवार यांनी त्यांना पुन्हा रोखले, असेही सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

संजय राऊत यांच्या ट्विटमधून स्पष्ट संकेत
बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट 22 जून रोजी केलेल्या दोन ट्विटवरून या सर्व घडोमोडींचे स्पष्ट संकेत मिळतात. त्यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास ‘महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने…’ असे ट्विट केले होते. त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाइव्ह झाले. त्यानंतर लगेचच 5.53 वाजता संजय राऊत यांनी ‘होय, संघर्ष करणार!!’ असे ट्विट केले.

30 वर्षांपूर्वीच्या घटनेची आठवण
सन 1992मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माधव देशपांडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दुखावले गेले आणि त्यांनी शिवसेना सोडत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि बाळासाहेबांनी निर्णय मागे घेतला. या सर्व घडामोडीत राज्यात शिवसेनेचा खुंटा आणखी बळकट झाला.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी देखील तशीच भूमिका घेतली असली तरी, शरद पवार यांच्याबरोबरच काँगेसच्या आग्रहाखातर मुख्यमंत्रीपद न सोडण्याचा निर्णय घेतला.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -