केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा केली. यानुसार आजपासून (१९ सप्टेंबर) नव्या संसद भवनात अधिवेशन सुरू होत आहे. मात्र यापूर्वी बैठकीचं आयोजन भाजपाने केलं होतं. यावेळी अनेक मुद्द्यावर चर्चा झाली त्यापैकीच एक म्हणजे संसदेत मांडण्यात येणाऱ्या महिला आरक्षण विधेयकावर विशेष खल सुरू होता. माहितीनुसार महिला आरक्षण विधेयक कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात आलं आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून विधेयक मंजूर केलं जाईल अशी माहिती दिली. मात्र, काही वेळातच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही पोस्ट डिलीट करण्यात आली. यामुळे चर्चा वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
संसदेच्या विशेष सत्रादरम्यान सोमवारी 18 सप्टेंबर रोजी संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्याची अधिकृत माहिती आलेली नाही, परंतु एएनआयने सूत्रांच्या म्हणण्यानुसार महिला आरक्षण विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे.
आरक्षण विधेयक मंगळवारी (१९ सप्टेंबर) लोकसभेत मांडण्यात येणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. 2010 मध्येच महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर झाले होते. महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची तरतूद यामधे करण्यात आली आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास पुढील लोकसभा निवडणुकीनंतर सभागृहातील प्रत्येक तिसरी सदस्य एक महिला असेल.
हे ही वाचा – Parliament Special Session : सुप्रिया सुळेंकडून पंतप्रधानाच्या भाषणाचे कौतुक; पण…