घरराजकारणजसे सरकार गेले, तसे परतही येईल; जयंत पाटलांना विश्वास

जसे सरकार गेले, तसे परतही येईल; जयंत पाटलांना विश्वास

Subscribe

सर्व व्यवस्थांवर दबाव आणला जात आहे. पाटणवासीय दडपशाहीत आहे. दबाव असतानाही कार्यकर्ते लढले. त्यामुळे ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवारांना अमिष दाखवले जाईल. त्यांना निरोप येईल. मात्र अशा भूलथापांना बळी पडू नका, असा सल्लाही पाटील यांनी दिला. 

साताराः महाविकास आघाडी सरकार जसे गेलेले कळाले नाही, तसे ते अल्पावधीत परत आलेलेही कळणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाद्धक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांनी दिला. पाटण येथील कार्यक्रमात पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, धीर धरा, सर्वकाही ठिक होईल. शरद पवार हे आपल्या पाठिशी आहेत. वेळ आणि काळ बदलला की सर्व काही ठिक होते. त्यामुळे संयम ठेवा. तुम्हाला धीर द्यायला मी आलो आहे. खोक्यांच्या पलिकडे जाऊन विचार न केल्यानेच सत्तातंर झाले. सरकार हुकुमशाह असल्यासारखे वागत आहेत. सर्व व्यवस्थांवर दबाव आणला जात आहे. पाटणवासीय दडपशाहीत आहे. दबाव असतानाही कार्यकर्ते लढले. त्यामुळे ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवारांना अमिष दाखवले जाईल. त्यांना निरोप येईल. मात्र अशा भूलथापांना बळी पडू नका, असा सल्लाही पाटील यांनी दिला.

- Advertisement -

पाटणातील काळोली येथे ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायट्या यांच्या निवडणुकीतील विजयी व पराभूत उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होते. पुढे ते म्हणाले, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मुंबई महापालिकेची निवडणूक शिंदे-फडणवीस सरकार जाणीवपूर्वक पुढे ढकलत आहे. हे सरकार आता घाबरले आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार नाही. हे सरकार लवकरच जाईल.

महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. मुख्य प्रश्नांपासून लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपचा खटाटोप सुरु आहे. नागरिकांंमध्ये द्वेष पसरवण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ४० आमदारांना वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. मुख्यमंत्री व त्यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यांच्याच गटातील आमदार एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

- Advertisement -

गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी बंड केले व शिवसेनेला धक्का दिला. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले. महाविकास आघाडीचे सरकार गेले व शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. तेव्हापासून शिंदे गट, भाजप व महाविकास आघाडातील नेत्यांमध्ये नेहमीच शाब्दिक चकमक होत आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -