घरराजकारणबाळासाहेबांचे विचार आम्ही बीकेसीवर मांडू, न्यायालयाच्या निकालावर शिंदे गटाची प्रतिक्रिया

बाळासाहेबांचे विचार आम्ही बीकेसीवर मांडू, न्यायालयाच्या निकालावर शिंदे गटाची प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : दसरा मेळाव्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. आम्ही आमचा दसरा मेळावा बीकेसीवर घेऊ. तिथे आम्ही शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडू, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी दिली. उच्च न्यायालयाच्या परवानगीमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार आहे.

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर पक्षावर दोघांनीही दावा केला आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा नक्की कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे गटानेही मुंबई महापालिकेकडे अर्ज केला होता. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत मुंबई महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती. त्याआधीच उद्धव ठाकरे यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यापाठोपाठ शिंदे गटाने मध्यस्थी याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत, दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला परवानगी दिली.

- Advertisement -

त्यावर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी न्यायालयाचा हा निर्णय आम्हाला मान्य आहे. आम्हाला वाद निर्माण करायचा नाही. आम्ही आमचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर घेऊ. आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडायचे आहेत. ते त्यांचा दसरा मेळावा घेतील. आम्ही आमची तयारी सुरू केली आहे, अशी प्रतिक्रिया दिली. काळजी करण्याचे कारण नाही. बीकेसी मैदानही बाळासाहेब ठाकरे यांच्या घराच्या जवळच आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

भव्यदिव्य दसरा मेळावा
उच्च न्यायालयाचा हा निकाल शिंदे गटाला फटका मानला जातो. त्यासंदर्भात विचारले असता शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, असे फटका वगैरे काही नसते. अशा प्रकारे न्यायालयात दाद मागणे लोकशाहीत अभिप्रेतच आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल शिवसैनिकांमधील उत्साहाचे वातावरण पाहता शिंदेंच्या मेळाव्याला शिवाजी पार्क अपुरे पडले असते, असा दावाही त्यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – मी दोन टर्मचा खासदार, कुठे बसायचं हे मला कळतं; श्रीकांत शिंदेंचा ‘त्या’ फोटोप्रकरणी राष्ट्रवादीवर पलटवार

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -