Eco friendly bappa Competition
घर राजकारण महाराष्ट्राला पुन्हा मिळणार नवे राज्यपाल? रमेश बैस यांच्या कार्यमुक्तीची चर्चा

महाराष्ट्राला पुन्हा मिळणार नवे राज्यपाल? रमेश बैस यांच्या कार्यमुक्तीची चर्चा

Subscribe

आता राज्याचे हे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे लवकरच कार्यमुक्त होऊ शकतात अशा चर्चा रंगल्या आहेत. जर असं झालं तर राज्याला नवे राज्यपाल मिळतील. त्यामुळे राज्याचे नवे राज्यपाल कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवृत्ती घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली. आता राज्याचे हे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे लवकरच कार्यमुक्त होऊ शकतात अशा चर्चा रंगल्या आहेत. जर असं झालं तर राज्याला नवे राज्यपाल मिळतील. त्यामुळे राज्याचे नवे राज्यपाल कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ( Will Maharashtra get a new governor again Discussion of Ramesh Bais dismissal )

छत्तीसगड जिंकण्यासाठी रमेश बैस यांची निवड?

माजी मुख्यमंत्री डाॅक्टर रमण सिंह यांच्या नेतृत्वाला विराम मिळाल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून छत्तीसगढ भाजपमध्ये नेतृत्त्वाची पोकळी निर्माण झाली. राज्यात सत्ताधारी काॅंग्रेसचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह बघेल यांना आव्हान देऊ शकणारे नेतृत्व भाजपजवळ नाही.

- Advertisement -

त्यामुळे रमेश बैस यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय करण्याविषयी भाजप श्रेष्ठी गंभीरपणे विचार करत असल्याचे सूत्रांचे म्हणणं आहे. तसं झाल्यास चालू वर्षाअखेर मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांसबोत छत्तीसगढमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बैस यांची लवकरच राज्यपालपदाच्या सोनेरी पिंजऱ्यातून सुटका होण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा: “सत्तेचा आसूरी अहंकार सोडा” भाजपच्या त्या पोस्टवर काॅंग्रेसचं उत्तर, ‘भाजप नेत्यांची भाषा’… )

बैस यांचा छत्तीसगढमधील दांडगा संपर्क

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पुढच्या काही महिन्यांत भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून छत्तीसगढ विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी 75 व्या वर्षी कधीही पुनरागमन होऊ शकते. रमण सिंह यांच्या प्रमाणे क्षत्रिय समाजाचे बैस वर्षापासून राज्यपाल असले तरी त्यांचा छत्तीसगढमधील संपर्क दांडगा आहे.

कोण आहेत रमेश बैस?

बैस यांचा जन्म 02 ऑगस्ट 1947 रोजी रायपूरमध्ये झाला. त्यांचं शालेय शिक्षण भोपाळमध्ये झालं. पुढे त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1978 मध्ये ते रायपूरच्या नगरपालिकेत निवडून आले. 1980 मध्ये झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत बैस यंनी काॅंग्रेसच्या सत्यनारायण शर्मा यांचा परावभ करत बाजी मारली. 1989 मध्ये ते पहिल्यांदा भाजपकडून लोकसभेवर निवडून गेले. रायपूर मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून येत गेले. 1989 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते पर्यावरण आणि वनखात्याचे मंत्री होते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत रमेश बैस यांना पुन्हा तिकीट दिलं नाही. मात्र त्यांची नियुक्ती त्रिपुराच्या राज्यपाल पदावर करण्यात आली.

2021 पासून रमेश बैस हे झारखंडचे राज्यपाल आहे. 2019 ते 2021 कालावधीत ते त्रिपूराचे राज्यपाल होते. सध्या ते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.

- Advertisment -