घरराजकारणशिक्षा होणारच; याकूब मेमन प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

शिक्षा होणारच; याकूब मेमन प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी याकूब मेमन याच्या कबरीच्या सुशोभीकरणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. याकूब मेमन याची कबर फुलांनी सजवण्यात आली तसचे त्याभोवती लाईटींग आणि कठडा देखील उभारण्यात आला. या विरोधात भाजपने शिवसेनेवर एकंदरीत मुंबई महानगर पालिकेवर सत्ता असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला. आता या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या संपूर्ण वादग्रस्त प्रकरणावर भाष्य करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत, जे चुकीचे आहेत त्यांच्यावर कारवाई होईल असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले

 

- Advertisement -

याकूब मेमन कबर वादग्रस्त प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

याकूब मेमन कबर शुशोभीकरणाचा मुद्दा चांगलाच पेटला होता. यावर भाजपतर्फे आक्रमक पवित्रा घेण्यात आला मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही प्रकारचे भाष्य करणं टाळलं मात्र आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी हजेरी लावली. दर्शन घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी या वादग्रस्त विषयावर भाष्य करणं टाळलं आणि थोडक्यात प्रतिक्रिया दिली. “या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस सध्या तपास करत आहे. जे चुकीचे आहे त्यांच्यावर कारवाई होईल” असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय.

- Advertisement -

 

याकूब मेमन प्रकरणावर भाजपची भूमिका 

भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत याकूब मेमन प्रकरणावरुन शिवसेनेवर उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीक केली आहे. पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा अशा तिखट शब्दात शेलारांनी उद्धव ठाकरे तसचे आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला. आणि मुंबई महानगर पालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

 

शिवसेनेची भूमिका काय ?

दरम्यान युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेलांच्या टीकेला प्रत्युत्तर देत या संपूर्ण प्रकरणाशी महापालिका आणि शिवसेनेचा काहीही संबध नाही तसेच केंद्र सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला

हे ही वाचा – उध्दव ठाकरेंसोबत धर्मवीर आनंद दिघेंचा फोटो, पुण्यात रंगली बॅनरबाजी

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -