Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर रायगड खालापूरात लोक अदालतीत ३.६७ कोटीची वसुली

खालापूरात लोक अदालतीत ३.६७ कोटीची वसुली

Subscribe

खालापूर येथील न्यायालयात आयोजित लोकअदालताथ गुन्हेगारीविषयक प्रकरणे ७५२ ठेवण्यात आली होती, त्यापैकी ११३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यावेळी एकूण ३ कोटी ६७ लाख ४४ हजार ७५६ रुपयांची वसुली करण्यात आली.

चौक: खालापूर येथील न्यायालयात आयोजित लोकअदालताथ गुन्हेगारीविषयक प्रकरणे ७५२ ठेवण्यात आली होती, त्यापैकी ११३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यावेळी एकूण ३ कोटी ६७ लाख ४४ हजार ७५६ रुपयांची वसुली करण्यात आली. कक्ष क्रमांक एक येथे दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे यांचे काम सह दिवाणी न्यायाधीश पी.एम. माने यांनी पाहिले. कक्ष क्रमांक दोन येथे वाद पूर्व आणि गुन्हा कबुलीची प्रकरणे यांचे काम दिवाणी न्यायाधीश क. स्तर आर.डी. वाबळे यांनी पाहिले. विधिज्ञ रितेश पाटील आणि रमेश पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. तसेच दिनेश राठोड कनिष्ठ लिपिक खालापूर न्यायालय यांनी व्यवस्थापनाची कामे पाहिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -