Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर रायगड खालापुरात चार महिन्यांत ५ बळी

खालापुरात चार महिन्यांत ५ बळी

कारखानदारी अपघाताचा हॉटस्पॉट

Related Story

- Advertisement -

कारखानदारीचा तालुका असलेल्या खालापुरात विविध अपघाताच्या घटनांमुळे चार महिन्यांत 5 बळी गेले असून, 10 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्यामुळे कारखानदारी अपघाताचा हॉटस्पॉट बनत आहे. तालुक्याच्या हद्दीत सध्या सुरू असलेल्या कारखान्यांची संख्या 280 च्या घरात आहेत. कारखानदारीने सुबत्ता आणली असली तरी प्रदूषणाची वाढलेली पातळी आणि कित्येक कारखान्यात सुरक्षा नियमांचे होत नसलेले पालन यामुळे तेथे काम करणार असुरक्षित असून, आसपासची गावे देखील ज्वालामुखीच्या तोंडावर असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये ढेकू येथील आर्कोस जस्नोवा फार्मा अँड स्पेशालिस्ट केमिकल कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात 2 ठार आणि 10 जखमी, शिवाय विषारी वायुगळती झाली.

उत्तम स्टील कारखान्यात लागलेली आग, एशियन कलर कोट कारखान्यात 15 दिवसांपूर्वी लोखंडी कॉईल खाली चिरडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर काही दिवसांपूर्वी ढेकू येथे प्रासोल कारखान्यात भीषण आगीची घटना घडली होती. ही आग विझत नाही तोपर्यंत उंबरे येथील ब्राईट ईन्व्हायरमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यात कामगाराचा भाजून मृत्यू झाला होता. या अपघाताच्या घटनेशिवाय नोंद न होणार्‍या अपघाताच्या अनेक घटना घडत असून, परस्पर प्रकरणे मिटविण्याचे प्रकार घडतात.

- Advertisement -

कामगारांच्या मृत्यूनंतर उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला मदतीसाठी कारखान्याकडे हात पसरूनही तुटपुंज्या रकमेवर भागविले जाते. अनेक कारखान्यात प्रदूषण नियमावली, प्लांट सुरक्षा, कुशल कामगार याचे पालन केले जात नसल्याचे अपघातानंतर समोर आले आहे. प्रशासनाकडून देखील अशांना पाठीशी घातले जात असल्याने जीवघेण्या घटना आणि अपघात सातत्याने वाढत आहेत. अपघातानंतर मुख्य आरोपी मोकाट रहात असून चोर सोडून संन्याशाला फाशी अशा प्रकारामुळे कारखाना मालकांचे फावत आहे. असुरक्षित कारखान्यांची तपासणी कारखाना निरिक्षकांनी करण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.

तालुक्यात 286 कारखाने असून, धोकादायक रसायने हाताळण्यासाठी आवश्यक परवाना, कुशल कामगार, तसेच शासनाच्या आवश्यक परवाने आहेत का याची माहिती घेण्यात येत आहे. शिवाय दोन महिन्यांनी पडताळणी होणार आहे.
-ईरेश चप्पलवार, तहसीलदार

- Advertisement -