घररायगडजिल्ह्यात ८० प्लस चे ७९,९८० मतदार; एक हजार ३५६ जण शंभरी पार...

जिल्ह्यात ८० प्लस चे ७९,९८० मतदार; एक हजार ३५६ जण शंभरी पार केलेले

Subscribe

शतायुष्य भव असा आशीर्वाद आपण नेहमीच थोरामोठ्यांच्या तोंडून ऐकला आहे. त्याची प्रचिती जिल्ह्यातील मतदारांमध्ये दिसून येते आहे. जिल्ह्यात एक हजार ३५६ शतायुषी मतदारांचा समावेश मतदार यादी मध्ये आढळला आहे. कर्जत मतदार संघात सर्वाधिक ३९६ शंभरी गाठलेल्या मतदारांचा समावेश असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. आगामी निवडणूकीच्या तयारीचा भाग म्हणून मतदार यादी निवडणूक विभागाकडून अचूक करण्यात येत आहे.

अलिबाग: शतायुष्य भव असा आशीर्वाद आपण नेहमीच थोरामोठ्यांच्या तोंडून ऐकला आहे. त्याची प्रचिती जिल्ह्यातील मतदारांमध्ये दिसून येते आहे. जिल्ह्यात एक हजार ३५६ शतायुषी मतदारांचा समावेश मतदार यादी मध्ये आढळला आहे. कर्जत मतदार संघात सर्वाधिक ३९६ शंभरी गाठलेल्या मतदारांचा समावेश असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. आगामी निवडणूकीच्या तयारीचा भाग म्हणून मतदार यादी निवडणूक विभागाकडून अचूक करण्यात येत आहे.
मतदार यादी अचूक करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून मतदार यादीत नाव असणार्‍या ८० वर्षांहून अधिक वय असणार्‍या मतदारांची पडताळणी केली जात आहे. जिल्ह्यात ८० वर्षाहून अधिक वय असणार्‍या मतदारांमध्ये ७९ हजार ९८० मतदारांचा समावेश आहे. या मतदारांचे सर्वेक्षण रायगड जिल्हा निवडणूक विभागाकडून सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.
जिल्ह्यात ६० वर्षाहून अधिक वय असणार्‍या मतदारांची संख्या ३ लाख ३४ हजार ११७ इतकी आहे.
मतदार यादीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने तालुका निवडणूक विभाग आणि विधानसभा निहाय मतदार याद्या पडताळणी चे काम हाती घेतले आहे. मतदार याद्यांमध्ये दिलेल्या पत्त्यावर मतदार आढळून न आल्यास किंवा त्यांचा मृत्यू झाला असल्यास त्यांची नावे यादीतून वगळली जाणार आहेत. एक वर्षानंतर राज्यात प्रथम लोकसभा व नंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी रायगड जिल्हा परिषद , पंचायत समिती , महापालिका , नगरपालिका निवडणुकाही होणे अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
मृत, स्थानांतरित, दुबार नावे असणार्‍या मतदारांची नावे वगळण्यात येत आहे. जानेवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध यादीतील ८० वर्षांवरील मतदारांच्या पडताळणी बाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील ८० वर्षांहून अधिक वय असणार्‍या एकूण ७९ हजार ९८० मतदारांचे निवडणूक कर्मचार्‍यांतर्फे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ज्या मतदारांचे वय मतदार यादीमध्ये चुकीने त्यांचे मूळ वयापेक्षा जास्त टाकण्यात आले आहे अशांच्या वयाची दुरुस्ती केली जाणार आहे. मतदार यादीतील अस्पष्ट छायाचित्र असलेल्या मतदारांचे रेकॉर्ड शोधून योग्य छायाचित्र गोळा करून तसेच त्यांच्या नावाच्या नोंदीमध्ये इतर चुका नसल्याची खात्री करून मतदाराकडून नमुना क्र. ८ भरून घेण्यात येणार आहे.

२२ लाख ८३ हजार ३६४ मतदार
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांमध्ये २२ लाख ८३ हजार ३६४ मतदार आलेत. यामध्ये ११ लाख ६४ हजार २९१ पुरुष , ११ लाख १९ हजार २८ महिला आणि ४५ तृतीय पंथी मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात ८० वर्षाहून अधिक वय असणार्‍या मतदारांची संख्या ७९ हजार ९८० इतकी असलीतरी ज्येष्ठ नागरिक असणार्‍या मतदारांची संख्या खूप मोठी आहे. जिल्ह्यात ६० वर्षाहून अधिक वय असणार्‍या मतदारांची संख्या ३ लाख ३४ हजार ११७ इतकी आहे. यामध्ये ६० ते ६९ वय असणारे २ लाख ५४ हजार १३७ , ७० ते ७९ वय असणारे १ लाख ४० हजार ४७७ , ८० ते ८९ वय असणारे ६२ हजार २९२ , ९० ते ९९ वय असणारे १६ हजार ३३२ आणि वयाची शंभरी ओलांडणारे १ हजार ३५६ मतदार आहेत.

- Advertisement -

८० पेक्षा अधिक वय असणारे मतदार
जिल्ह्यात ८० पेक्षा अधिक वय असणारे ७९ हजार ९८० मतदार असल्याचे मतदार याद्यांवरून स्पष्ट झाले आहे. यामध्ये पनवेल विधानसभा क्षेत्रात ९ हजार ३२५ मतदार , कर्जत१२ हजार १०५ मतदार , उरण ७ हजार ९९१ मतदार , पेण १२ हजार ३३६ मतदार , अलिबाग १४ हजार ५१९ मतदार , श्रीवर्धन ९ हजार १७९ मतदार आणि महाड १४ हजार ५२५ मतदारांचा समावेश आहे.

शंभरी ओलांडणारे मतदार
जिल्ह्यात वयाची शंभरी ओलांडणारे १ हजार ३५६ मतदार असल्याचे मतदार याद्यांवरून स्पष्ट झाले आहे. यामध्ये विधानसभा क्षेत्रनिहाय पाहता पनवेल विधानसभा क्षेत्रात ११० मतदार , कर्जत ३९६ मतदार , उरण १२१ मतदार , पेण २५५ मतदार, अलिबाग१६२ मतदार , श्रीवर्धन ७५ मतदार आणि महाड २३७ मतदारांचा समावेश आहे.
…….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -