घररायगडबांधबंदिस्ती फुटून ३०वर्षात ८ हजार एकर भातशेती नापीक, भातशेतीच्या जमिनीत खारफुटीची जंगले

बांधबंदिस्ती फुटून ३०वर्षात ८ हजार एकर भातशेती नापीक, भातशेतीच्या जमिनीत खारफुटीची जंगले

Subscribe

विदर्भ मराठवाड्यातील शेतकर्‍यांना दुष्काळाची झळ पोहचताच नुकसान भरपाई देण्यात येते. परंतु येथील जमिनी खारेपाण्याने नापिक होऊनही येथील शेतकर्‍यांना कोणतीही मदत करण्यात आलेली नाही. शेती हे उत्पन्नाचे साधन नष्ट झाल्याने येथील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

तालुक्यातील बहीरीचा पाडा ते नवखार या दरम्यानच्या गावांतील बांधबंदिस्ती फुटून मागील तीस वर्षात जवळपास ८ हजार एकर भातशेती नापीक झाली आहे. या जमिनीत आता खारफुटीचे जंगल तयार झाल्याने शेतकरी उद्धवस्त झाला आहे. मात्र, या गंभीर बाबीकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आमची शेती वाचवा अशी साद शेतकरी घालत आहेत.

अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा, बांगला बंदर ते नवखार दरम्यानच्या १७ गावांतील जवळपास ८हजार एकर भातशेतीच्या जमिनीत आता खारफुटीची जंगले निर्माण झाली आहेत. खारफुटी तोडणे हा गुन्हा आहे. त्यामुळे जमिनीचे मालक असूनही शेतकर्‍यांना जमिनीत काहीही करता येत नाही. सरकारने शेतकर्‍यांच्या या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे. येथील खाडी किनार्‍यावरील बांधबंदिस्ती मजबूतीने उभारणी करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

विदर्भ मराठवाड्यातील शेतकर्‍यांना दुष्काळाची झळ पोहचताच नुकसान भरपाई देण्यात येते. परंतु येथील जमिनी खारेपाण्याने नापिक होऊनही येथील शेतकर्‍यांना कोणतीही मदत करण्यात आलेली नाही. शेती हे उत्पन्नाचे साधन नष्ट झाल्याने येथील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील शेतकर्‍यांप्रमाणे आम्हीही आत्महत्या कराव्यात का? असा प्रश्न येथील शेतकरी उपस्थित करीत आहेत.

शेतीत खारफुटीची जंगले तयार होण्यास मजबूतीने न केलेली बांधबंदिस्तीची कामे हे मूळ कारण आहे. समुद्राला आलेल्या उधानामुळे वेळोवेळी बांधबंदिस्ती फुटून समुद्राचे खारे पाणी भातशेतीत घुसते. या पाण्याबरोबरच खारफुटीच्या बियाही शेतीत वाहून येतात. कालांतराने या बिया रुजून येथे खारफुटीची झाडे तयार होतात. खारफुटी तोडणे गुन्हा असल्याने खारफुटी वाढत जाऊन आता येथील भातशेतीत खारफुटीची जंगले तयार झाली आहेत.

- Advertisement -

बहिरीचा पाडा येथे अंदाजे १५०० एकर, रामकोटा १५५, सोनकोटा ६००, नारंगीखार ७५० एकर, हाशिवरे ३०००, वैजाळी २५०, रांजणखार २५०, मांडवखार ४५०, फोफेरी ३०० व कावाडे ते रेवस पर्यंत ४५० एकर, सारळ ते नवखार ५०० एकर भातशेतीवर खारफुटीची जंगले तयार झाली आहेत.

शेतीत खारफुटी उगविल्याने येथे भातशेती करता येत नाही. तर प्रकल्पांना होणारा विरोध लक्षात घेता येथे कोणताही प्रकल्प येण्यास तयार नाही. त्यामुळे येथील खारबंदिस्ती सरकारने मजबूतीने बांधल्यास खारफुटी नष्ट होऊन, पुढील काही वर्षात ही जागा पुन्हा एकदा पीक घेण्या लायक होईल. याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. तसेच जोपर्यंत ही कामे होत नाहीत तोपर्यंत येथील शेतकर्‍यांना शेतसारा, घरपट्टी, पाणी पट्टी, वीजबिल, शिक्षण फी, इंधन बिले इत्यादी कर माफ करावेत
– संजय पाटील, ग्रामस्थ

समुद्राचे पाणी शेतीत जाऊन, शेती नापीक झाली आहे. परिणामी येथे बेरोजगारीही वाढली आहे. येथील शेतजमिनीला किंमत राहिलेली नाही. सरकारने बांधबंदिस्ती उभारल्यास पुढील काही वर्षात आम्ही पुन्हा पिक घेऊ शकतो.
– रजनी पाटील, स्थानिक महिला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -