Eco friendly bappa Competition
घर रायगड खोपोलीनजिक टँकरच्या केबिनला लागलेली आग

खोपोलीनजिक टँकरच्या केबिनला लागलेली आग

Subscribe

वेळीच योग्य ती कारवाई करण्यात आल्याने टँकरचा बहुतेक भाग सुरक्षित राहिल्याने मोठी हानी टळली. दरम्यान, आयआरबी यंत्रणेने सदर टँकर क्रेनच्या सहाय्याने घटना स्थळावरून सुरक्षित ठिकाणी बाहेर काढला आहे.

हाळ खुर्द: मुंबई-पुणे महामार्गावरील एचओसी ब्रिज मॅजिक पॉईंटजवळ (अंडा पॉईंट जवळ) एका टँकरच्या केबीनला अचानक आग लागली. मात्र प्रशासनाच्या सर्तकतेमुळे टँकरच्या केबिनला लागलेली आग आटोक्यात यश आले.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे महामार्गांवर एचओसी ब्रिज मॅजिक पॉईंटजवळ (अंडा पॉईंट जवळ) टँकर (क्रमांक एमएच १२ एलटी ५३०७) च्या केबीनला अचानक आग लागल्याची माहिती मिळाल्यावर खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश काळसेकर, पोलीस उपनिरिक्षक सुधाकर लहाने, बोरघाट पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी या अपघातात मोलाचे मार्गदर्शन केल्याने टँकरच्या केबिनला लागलेली आग आटोक्यात येण्यास मदत झाली. वेळीच योग्य ती कारवाई करण्यात आल्याने टँकरचा बहुतेक भाग सुरक्षित राहिल्याने मोठी हानी टळली. दरम्यान, आयआरबी यंत्रणेने सदर टँकर क्रेनच्या सहाय्याने घटना स्थळावरून सुरक्षित ठिकाणी बाहेर काढला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -