पनवेल / अलिबाग : ताम्हिणी घाटातील दुर्घटना ताजी असतानाच शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास रायगड जिल्ह्यात आणखी एक दुर्घटना घडली. एका खासगी बसला मुंबई-गोवा महामार्गावर आग लागली. चालकाच्या लक्षात आल्याने त्याने तातडीने गाडी थांबवली आणि प्रवाशांना उतरवले. त्यामुळे गाडीतील सर्व प्रवासांचे जीव वाचले. मात्र, प्रवाशांचे सर्व सामान आगीत खाक झाले आहे.
खापरोबा ट्रॅव्हल्सची एसी स्लीपर कोच (एमएच-47-एएस-6003) मुंबईतील जोगेश्वरीहून मालवणला जाता होती. शनिवारी मध्यरात्री म्हणजेच 12 वाजण्याच्या सुमारास ही बस कोलाडमधून पुढे जात होती. बस कोलाट रेल्वे पुलाजवळ आलेली असताना अचानक बसच्या मागील मोठा आवाज झाला. चालकाने गाडी थांबवून पाहिले असता बसने मागून पेट घेतल्याचे दिसले. चालकाने लगेचच सर्व प्रवासांना सावध केले आणि उतरवले. त्यानंतर काही वेळातच आगीचा मोठा भडका उडाला. तत्पूर्वी बसमधील सर्व 34 प्रवासी उतरल्याने मोठी जीवितहानी टळली.
हेही वाचा… Accident : ताम्हिणी घाटात भीषण अपघात, लग्नाच्या वऱ्हाडातील काही ठार, अनेक जखमी
प्रवासी उतरल्यावर काही वेळात बस आगीत खाक झाली. यात प्रवाशांचे सर्व सामान, कागदपत्रे, मोबाईल, पैसे जळून गेले. आगीची माहिती मिळताच धाटाव एमआयडीसी, दीपक नायट्रेट कंपनी यांचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी रवाना झाले. तसेच कोलाड रेस्क्यू टीम आणि पोलीस यांनी बचाव कार्य केले. त्यानंतर आग नियंत्रणात आली.
विशेष म्हणजे शुक्रवारी (20 डिसेंबर) सकाळी दहाच्या सुमारास थरकाप उडवणार अपघात माणगावजवळील ताम्हिणी घाटात झाला होता. पुण्याहून महाड बिरवाडीकडे येणारी लग्नाच्या वऱ्हाडाची बसचा वळणावर उलटली. यात दुर्घटनेत 5 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 28 वऱ्हाडी जखमी झाले होते. यातील अनेक वऱ्हाडी बसखाली चिरडले गेले होते. त्यानंतर अवघ्या ३६ तासांत याच भागात ही दुसरी दुर्घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या बसला मागून आगी कशी लागली, याचा तांत्रिक तपास करून शोध घ्यायला हवा. म्हणजे भविष्यात अशा प्रकराच्या दुर्घटना होणार नाहीत, अशी मागणी प्रवासांनी केली आहे.
(Edited by Avinash Chandane)