पनवेल : सर्वांगाचा थरकाप उडवणारा अपघात आज (20 डिसेंबर) सकाळी रायगड जिल्ह्यात झाला. ताम्हिणी घाटात रस्त्याच्या कडेला उलटल्याने 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 28 प्रवासी जखमी झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे अनेक प्रवासी गाडीखाली चिरडले गेले आहेत. या प्रकरणी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक खासगी बस (एमएच-14-जीयू-3405) लोहगाव पुणे येथून पिंपरी-चिंचवडवरून लग्नाचे वऱ्हाड घेऊन महाड तालुक्यातील बिरवाडी येथे लग्नासाठी जात होती. सकाळी पावणेदहाच्या सुमारास माणगाव तालुक्यातील ताम्हिणी घाटात बस असताना वॉटरफॉल पॉईंटजवळ वळणावर बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि बस उलटली. ही अपघात इतका भयंकर होता की, पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असल्याचे कळते. बसमध्ये 45 वऱ्हाडी होते, अशी माहिती मिळते. हे वऱ्हाड जाधव कुटुंबीयांचे होते. अपघातानंतर घटनास्थळी माणगाव पोलिसांचे पथक तसेच SVRSS टीम दाखल झाली आणि त्यांनी मदत कार्य सुरू केले. जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील तीन गंभीर जखमींना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मृतांची नावे
- संगीता धनंजय जाधव
- गौरव अशोक दराडे
- शिल्पा प्रदीप पवार
- वंदना जाधव
- गणेश इंगळे
जखमींची नावे
- सुप्रिया अरुण मांढरे (55, पुणे)
- विजय चव्हाण (46)
- अर्णव प्रशांत पवार
- शशिकला बबन पवार (71)
- सुधा अशोक माने (60, पुणे)
- संतोष मनोहर पार्टे (55)
- वैभवी संतोष पार्टे (21, पुणे)
- योगिता यशवंत कुचेकर (44, पुणे)
- तृप्ती संजय इंदुरे (42)
- मीरा आगावेकर (70)
- शार्दुल इंदूरे
- पायल मालुसरे (24, पुणे)
- सुवर्णा कुचेकर (47, पुणे)
- सुनीता अशोक धनवडे (50, पुणे)
- सुरेखा शांताराम जाधव (64, औंध, पुणे)
- संगीता नामदेव जाधव (62, औंध, पुणे)
- लीना प्रवीण पवार (41, स्वारगेट, पुणे)
- जान्हवी राकेश सकपाळ (18, औंध, पुणे)
- अनिता शिवाजी पार्टे (45, येरवडा, पुणे)
- श्राव्या प्रवीण पवार (12)
- रुपाली धनावडे (30, राजेंद्रनगर, पुणे)
- समर्थ धनावडे (साडेतीन वर्षे)
- सविता संतोष पार्टे (48, पुणे)
- प्रियंका कृष्णा तुरडे (34, राजेंद्र नगर, पुणे)
- युवराज कृष्णा तुरडे (11, राजेंद्र नगर, पुणे)
- द्रोना गौरव धनावडे (8)
- रोहिणी शिवाजी जगताप (50, खडकी, पुणे)
- तनिषा गिरीश जाधव (16)
(Edited by Avinash Chandane)