घररायगडबैलगाडा शर्यतीत महिलेचा अपघाती मृत्यू; आयोजकांवर गुन्हा दाखल

बैलगाडा शर्यतीत महिलेचा अपघाती मृत्यू; आयोजकांवर गुन्हा दाखल

Subscribe

खालापूर तालुक्यातील वडवळ येथील बैलगाडा शर्यतच्या दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या शर्यतीसाठी आयोजकांनी परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आयोजकांवर खालापूर पोलिस ठाण्यात कलम ३०४ आणि कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोपोली: खालापूर तालुक्यातील वडवळ येथील बैलगाडा शर्यतच्या दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या शर्यतीसाठी आयोजकांनी परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आयोजकांवर खालापूर पोलिस ठाण्यात कलम ३०४ आणि कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बैलांच्या शर्यती धोकादायक असल्याने मध्यंतरी न्यायालयाने यावर बंदी आणली होती. पण, त्यांना अखेर न्यायालयानेच मान्यता दिली. या शर्यतीत बैलांवर अत्याचार होतो, असा काहींचा आक्षेप होता. आता बैलांच्या शर्यती राज्यात सुरू आहेत. वडवळ येथे बैलगाडा शर्यती दरम्यान झालेल्या अपघातात परिसरात कलिंगड विक्रीचा व्यवसाय करणार्‍या अनिता बाळाराम गायकवाड (५८) यांचा मृत्यू झाला.
काही दिवसापूर्वी घोडिवली खालापूर येथे ही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या तिन जणांना बेताल झालेल्या बैलांनी धावपट्टी सोडून बघ्यांच्या गर्दीत घुसले यामध्ये ३ जखमी झाले होते. अलिबाग येथील बैलगाडी शर्यतीमध्ये गंभीर जखमी झालेल्या २ जणांचे रुग्णालयात दाखल केले असता मृत्यू झाला होता. तसेच पेण तालुक्यात सुद्धा शर्यती दरम्यान एक जण जखमी झाला होता
बैलगाड्यांची शर्यत भरवायची असेल, तर त्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. पण, काही गावांमध्ये अजूनही परवानगी घेण्यात येत नाही. त्यामळे तिथे पोलीस बंदोबस्त नसतो. शर्यतीतील गर्दी होत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. अशा दुर्घटना घडू नये, यासाठी गावकर्‍यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच शर्यतीसाठी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे मत सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. तर बैलांच्या जोडीवर प्रथम दर्शनी एका गोंडाची किमंत २५ हजार लावण्यात येत असली तरी अप्रत्यक्षात मागील दाराने १० ते १५ लाखाच्या दरात असते हाही जुगारच असल्याचे एका बैलगाडी शर्यती मालकाने सांगितले. तर कल्याण येथील बैलगाडी शर्यती वरुन विरोधी गटाने गोळीबार केला होता. यामधे पनवेल विहीघर येथील फडके कुटुंबांवर मोक्का कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

आयोजकांनी परवानगी घेतली नसल्याची माहिती
खालापुर तालुक्यातील वडवळ येथील बैलगाडा शर्यतच्या दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या शर्यतीसाठी आयोजकांनी परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आयोजकांवर खालापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलांच्या शर्यती धोकादायक असल्याने मध्यंतरी कोर्टानं त्यावर बंदी आणली होती. पण, त्यांना अखेर कोर्टानं मान्यता दिली. या शर्यतीत बैलांवर अत्याचार होतो, असा काहींचा आक्षेप होता. आता बैलांच्या शर्यती राज्यात सुरू आहेत. खालापुर तालुक्यातील वडवळ येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यती दरम्यान झालेल्या अपघातात परिसरात कलिंगड विक्रीचा व्यवसाय करणा-या महिलेचा मृत्यू झाला. यामुळे मैदानात एकच खळबळ उडाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -