घररायगडअडीच हजार कोटींहून अधिक महसूल जमा; जिल्हा प्रशासन मालामाल

अडीच हजार कोटींहून अधिक महसूल जमा; जिल्हा प्रशासन मालामाल

Subscribe

गेल्या आर्थिक वर्षात मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कातून जिल्हा प्रशासन मालामाल झाला असून दोन हजार पाचशे कोटींहून अधिक महसूल जमा करण्यात जिल्हा मुद्रांक प्रशासनास यश आले आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निबंधक यांनी दिली. मात्र २०२२-२३या आर्थिक वर्षात शासनाने दिलेल्या इष्टांकपेक्षा अधिक महसूल गोळा करीत एक लाख छत्तीस हजार आठशे पंचेचाळीस दस्त संख्या तयार करण्यात यश मिळविले असल्याचेही सांगण्यात आले.

अलिबाग:-अमूलकुमार जैन

- Advertisement -

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत बांधकाम क्षेत्राला जबरी फटका बसला होता. अनेकाच्या नोक-या गेल्या होत्या. अनेकाच्या वेतनात कमालीची कपात करण्यात आली होती. त्यामुळे नोकरदारवर्ग नवीन घर खरेदी करण्यास धजावत नव्हता. दरम्यान स्थिती बदलली आणि रिअल इस्टेट क्षेत्राने पुन्हा वेग घेतला आहे.
१७४३.४८कोटी रुपयांचा महसूल
सन२०१७-१८ या आर्थिक वर्षात१५०० कोटी रुपयांचा इष्टांक देण्यात आला असतानाही ११०५१३ दस्तऐवज झाले असून यामध्ये १७८५.१४कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे.त्याचप्रमाणे सन२०१८-१९ या आर्थिक वर्षात१८२० कोटी रुपयांचा इष्टांक देण्यात आला असतानाही ११४८५० दस्तऐवज झाले असून यामध्ये १९७८.९८कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. सन२०१९-२० या आर्थिक वर्षात २०२८ कोटी रुपयांचा इष्टांक देण्यात आला असतानाही १०९७४१ दस्तऐवज झाले असून यामध्ये १७४३.४८कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे.

- Advertisement -

विक्रमी महसूल जमा
सन १९२०-२१या आर्थिक वर्षात १३००कोटी रुपयांचा इष्टांक देण्यात आला असतानाही १०२३३६ दस्तऐवज झाले असून यामध्ये १४७०.४४कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे.तर सन२०२१-२२ या आर्थिक वर्षात१८८० कोटी रुपयांचा इष्टांक देण्यात आला असतानाही १२६२९९ दस्तऐवज झाले असून यामध्ये २१६१.९५कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे.२०२२-२३ मध्ये २१३० कोटी रुपयांचा इष्टांक देण्यात आला असतानाही १३६८४५ दस्तऐवज झाले असून यामध्ये २५००कोटीहुन अधिक रुपयांचा महसूल जमा केला आहे.

सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू
रायगड जिल्ह्यातील बहुतांश विकसित भाग या क्षेत्रात येतो; तर दक्षिण रायगडमधील क्षेत्रासाठी सहा टक्के स्टॅम्पड्युटी आहे. यातील एक टक्का जिल्हा परिषद किंवा महापालिका, नगरपालिका यांना हिस्सा जातो. याचा वापर या स्थानिक संस्था तेथील पायाभूत विकासकामांसाठी खर्च करू शकतात.दस्त नोंदणीसाठी सुट्टीतही कामकाजपक्षकारांना सोयीचे व्हावे म्हणून दररोज एक ते दोन तासांचा वेळनोंदणीसाठी वाढवून दिला होता. तसेच सुट्टीच्या आणि शनिवारी दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होती .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -