घररायगडमुरुड तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना

मुरुड तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना

Subscribe

तालुका पर्यटन स्थळ असल्याने देश -विदेशातुन लाखो पर्यटक ये-जा करीत असले तरी काही पर्यटकांच्या आततायीपणामुळे मुरुड तालुक्यातील काशिद,चिकनी, मुरुड आदिंसह समुद्रकिनारी पोहत असताना आतापर्यंत १४२ जणांना आपला जीव गमवावा लागला.त्यानंतर पर्यटकांची सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला होता. पर्यटकांची संख्या वाढवावी व पर्यटकांचा प्रवास सुखाचा व्हावा याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश सकपाळ आणि पोलिस नाईक सागर रसाळ यांनी काशिद, मुरुड,राजपुरी समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.त्याचं पालन पर्यटकांनी केलं तर पर्यटक सुरक्षित राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मुरुड: तालुका पर्यटन स्थळ असल्याने देश -विदेशातुन लाखो पर्यटक ये-जा करीत असले तरी काही पर्यटकांच्या आततायीपणामुळे मुरुड तालुक्यातील काशिद,चिकनी, मुरुड आदिंसह समुद्रकिनारी पोहत असताना आतापर्यंत १४२ जणांना आपला जीव गमवावा लागला.त्यानंतर पर्यटकांची सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला होता. पर्यटकांची संख्या वाढवावी व पर्यटकांचा प्रवास सुखाचा व्हावा याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश सकपाळ आणि पोलिस नाईक सागर रसाळ यांनी काशिद, मुरुड,राजपुरी समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.त्याचं पालन पर्यटकांनी केलं तर पर्यटक सुरक्षित राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पर्यटक किंवा शालेय विद्यार्थी/ शिक्षक यांची सहल काशीद बीच येथे आल्यावर पहिल्यांदा पोलिस कर्मचारी त्यांना गाडीमधून खाली उतरल्यावर त्यांना त्यांच्या शाळेचे नाव, विद्यार्थी संख्या, शिक्षक, जिल्हा इत्यादी माहिती रजिस्टर मध्ये नोंद केली जाते. धोक्याचा इशारा म्हणून सायरन चा इशारा दिला जातो., लाऊड स्पीकर द्वारे पर्यटक अथवा शालेय विद्यार्थी शिक्षक यांना समुद्राच्या पाण्यात जाऊ नये याबाबत सूचना दिल्या जातात. वयोवृध्द माणसे, महिला,बालके हे गर्दी ठिकाणी हरवल्यास त्यांना लाऊस्पिकरच्या साह्याने जलद माहिती देता येते. बीच आणि रस्त्यावर प्रत्येकी दोन सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. लाईफ गार्ड यांची नेमणूक करण्यात आली आहे. रेस्क्यू बोट (बचाव) करिता जेट्सकी वापर केला जातो. पाच धोकादायक सूचना फलके लावण्यात आली असून बॉल, रिंग बॉय, रस्सी, लाईफ जॅकेट इत्यादी साधन सामुग्री उपलब्ध करून ठेवली आहे. वाहने पार्किंग बोर्ड लावण्यात आले आहेत. नो सेफ झोन असे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या उपाययोजनावर पर्यटकांनी काळजी पुर्वक लक्ष दिले व त्यांचे पालन केले तर समुद्रकिनारा वर कोणतेही वाईट दुर्घटना घडणार नाही, अशी प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक सकपाळ यांनी व्यक्त केली.

पर्यटकांनी आतातयीपण करु नये
काशिद समुद्रकिनारीे काही पर्यटक बिंधास्तपणे समुद्राचा पाण्याचा अंदाज आणि भरती ओहोटीची वेळ न पाहता पाण्यात पोहण्यासाठी उतरतात आणि वाईट दुर्घटना घडतात. अशा दुर्घटना घडु नये यासाठी रोज दोन पोलिस शिपाई या ठिकाणी तैनात केले आहे. येणार्‍या पर्यटकांचे स्वागत करुन काशिद समुद्राची नैसर्गिक रचना कशी आहे त्याची संपूर्ण माहिती दिली जाते. पर्यटकांनी आतातयीपण करु नये स्वत:ची आणि आपल्या परिवाराची काळजी घेऊन समुद्रकिनारावर आनंद घ्या खवळलेल्या समुद्रात पोहायला उतरु नका हा समुद्र पोहण्यासाठी धोकादायक आहे.जर कोणी ऐकत नसेल समुद्रात पोहण्यासाठी उतरत असेल तर लाईफ जॅकेट घालून व जीव रक्षकांना सांगुन व पाण्याचा अंदाज घेऊन पोहायला उतराआणि स्वताची काळजी घ्या असे आवाहन पोलिस मार्फत करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -