घर रायगड आदर्श पतसंस्था रौप्य महोत्सवी वर्षात सामजिक उपक्रम राबवणार

आदर्श पतसंस्था रौप्य महोत्सवी वर्षात सामजिक उपक्रम राबवणार

Subscribe

आदर्श नागरी सहकारी पतसंस्था रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या वर्षात आदर्श पतसंस्थेतर्फे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राविण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग समुद्रकिनार्‍यावर येत्या रविवारी आदर्श संगीत संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अलिबाग: आदर्श नागरी सहकारी पतसंस्था रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या वर्षात आदर्श पतसंस्थेतर्फे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राविण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग समुद्रकिनार्‍यावर येत्या रविवारी आदर्श संगीत संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आदर्श भुवन येथे गुरूवारआयोजित पत्रकार परिषदेत आभिजित पाटील बोलत होते. यावेळी आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, अध्यक्ष अभिजीत पाटील, उपाध्यक्ष कैलास जगे तसेच संचालक सतीश प्रधान, अनंत म्हात्रे, विलाप सरतांडेल, सुरेश गावंड, अ‍ॅड. रेश्मा पाटील, अ‍ॅड.वर्षा शेठ, सीए संजय राऊत, डॉ. मकरंद आठवले हे संचालक उपस्थित होते.
रौप्यमहात्सवी वर्षानिमित्त काही शाखांमध्ये नेत्रचिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आली होती. ज्यांच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू आढळून आले त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आलेला खर्च आदर्शतर्फे करण्यात आला. पाली तालुक्यातील आदिवासी शाळेला एक लाख रूपये मदत देण्यात आली. कुरुळ येथील आर सी एफ वसाहती मधील मतीमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आदर्शतर्फे गणवेष वाटप करण्यात येणार आहे. ७ मे रोजी होणार्‍या आदर्श संगीत संध्या कार्यक्रमात आदर्शतर्फे पोलीस कल्याण निधीसाठी २ लाख ११ हजार १११ रूपये देण्यात येणार आहेत, तसेच संस्थेने अलिबागमधील अनाथ आणि निराधार बालकांसाठी कार्यरत असलेली वात्सल्य ट्रस्ट या संस्थेला वेळोवेळी आर्थिक मदत केली आहे अशी माहिती अभिजित पाटील यांनी दिली.

व्यवसायाचा पल्ला ५०० कोटींवर
१ ऑक्टोबर १९९८ रोजी भाड्याच्या जागेत आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. पहिल्या वर्षी संस्थेचे भागभांडवल रु. ३० हजार रूपये होते तर रु. २५ लाख रूपयांच्या ठेवी होत्या. २५ वर्षांमध्ये आदर्शने एकत्रित व्यवसायाचा ५०० कोटी रूपयांचा पल्ला ओलांडला आहे. आदर्शने शाखा विस्तार केला असून सध्या आदर्शच्या १६ शाखा असून त्यापैकी ७ शाखा स्वमालकीच्या जागेत आहेत. रायगडसह ठाणे, मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग अशा सहा जिल्ह्यामध्ये संस्थेचे कार्यक्षेत्र आहे.

- Advertisement -

व्यवहार पेपरलेस करण्याचा प्रयत्न
रौप्य महोत्सवी वर्षात सभासद व ग्राहकांसाठी सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक , आरोग्य तपासणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम केवळ मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या अलिबागमध्येच आयोजित न करता संस्थेच्या सर्व शाखांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. सप्टेंबर महिन्यात सांगता समारंभ अलिबागमध्ये आयोजित केला जाईल. आदर्शमध्ये भविष्यात फेस लेस बँकिंग प्रणालीचा अवलंब करणार. आदर्शच्या ग्राहकांना घर बसल्या व्यवहार करता येतील अशा सुविधा देणार. आदर्शचे व्यवहार पेपरलेस करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती अभिजित पाटील यांनी यावेळी दिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -