घररायगडKhopoli News : वन खात्याच्या परवानगीनंतरही रस्ता जैसे थे! ताकई ग्रामस्थ आक्रमक

Khopoli News : वन खात्याच्या परवानगीनंतरही रस्ता जैसे थे! ताकई ग्रामस्थ आक्रमक

Subscribe

खालापूर तालुक्यातील खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाले आहेत. वन खात्याने परवानगी देऊनही कंत्राटदाराने रस्त्याचे काम न केल्यामुळे आक्रमक ग्रामस्थांनी पालिका अभियत्याला जाब विचारला आहे.

खोपोली : खालापूर तालुक्यातील ताकई रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून अपूर्णावस्थेत असताना वन खात्याच्या अडकाठीमुळे कामाला मुहूर्त मिळत नव्हता. परंतु महिन्याभरापूर्वी वन खात्याने डांबरीकरणासाठी परवानगी दिली असतानाही ठेकेदार काम सुरू करीत नसल्याने ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत बांधकाम अभियंता आणि संबंधित ठेकेदाराला मंगळवारी जाब विचारला. यावर एप्रिल महिन्याअखेरपर्यंत काम पूर्ण होईल, असे आश्वासन बांधकाम विभागाच्या अभियंत्याने दिले आहे. या आश्वासनामुळे रस्त्यामुळे जेरीस आलेल्या ग्रामस्थांनी तात्पुरता का होईना सुटकेचा निश्वास सोडला आहे.

हेही वाचा… Raigad News : रायगडमधील २७ पाणथळ जागांना ‘दस्तावेज’ सुरक्षा

- Advertisement -

खोपोली नगरपालिका हद्दीतील या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थ मेटाकुटीला आलेले आहेत. मधल्या काळात अनेक प्रशासकीय अधिकारी, ठेकेदार बदलले. रस्त्याच्या मागणीचा ग्रामस्थांचा रेटा वाढल्यानंतर त्यांच्या समाधानासाठी मोठ्या धुमधडाक्यात भूमिपूजन करण्यात आले. मात्र हा रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ताकई गाव ते बोंझर सोसायटीपर्यंतचा रस्ता पूर्ण झाला. परंतु पुढील 300 ते 400 मीटर अंतराचा रस्ता वन खात्याच्या हद्दीतून जात असल्याने काम करण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे खड्ड्यांतून मार्ग काढताना पादचार्‍यांप्रमाणे वाहनचालकांचीही त्रेधातिरपिट उडत होती.

हेही वाचा… Loksabha Election 2024 : रायगडमधील ‘जात’ फॅक्टर कुणाला धक्का देणार?

- Advertisement -

खोपोली नगर पालिकेला महिन्याभरापूर्वी वन खात्याने डांबरीकरणासाठी परवानगी दिली दिली होती. त्यानंतरही ठेकेदार काम सुरू करीत नसल्याने ताकई ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत बांधकाम विभागाच्या अभियंत्याला जाब विचारला. याप्रसंगी जयवंत पाटील, किसन पाटील, राकेश पाटील, डॉ. निकेश पाटील, संजय पाटील, राकेश पाटील, दिनेश पाटील, मंदार पाटील, समीर देवकर, अभियंता अनिल वाणी, सतीश हाडप उपस्थित होते. अखेर ग्रामस्थांच्या दबावानंतर पालिकेचे अभियंता वाणी यांनी एप्रिल महिन्याअखेरपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -