घररायगडदिघी पोर्टमधील आगरदांडा युनिट सुरु व्हावे; कृती समितीचे खासदार तटकरेंना साकडे

दिघी पोर्टमधील आगरदांडा युनिट सुरु व्हावे; कृती समितीचे खासदार तटकरेंना साकडे

Subscribe

दिघी पोर्टमधील आगरदांडा युनिट सुरु व्हावा यासाठी कृती समितीच्या शिष्टमंडळाने खासदार सुनील तटकरे यांची भेट घेत सदर पोर्टचे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करावे अशी विनंती त्यांना करण्यात आली. आगरदांडा भागातील दिघी बंदर विकासाचे काम फार मंद गतीने सुरु असून या भागात बंदर विभागाची पूर्ण कामे होऊ शकलेली नाहीत.गेली अनेक वर्ष या भागात काम न झाल्याने आगरदांडा भागातील विकास खुंटला आहे.त्यामुळे स्थानिक लोकांना नोकर्‍या व स्वयंरोजगार मिळू शकलेला नाही.

 

मुरुड: दिघी पोर्टमधील आगरदांडा युनिट सुरु व्हावा यासाठी कृती समितीच्या शिष्टमंडळाने खासदार सुनील तटकरे यांची भेट घेत सदर पोर्टचे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करावे अशी विनंती त्यांना करण्यात आली. मुरुड तालुक्यातील आगरदांडा आणि दिघी क्षेत्रात दिघी पोर्टचे काम सुरु असून सुमारे ३५०० कोटी रुपये खर्च करून सदरचा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य शासन सक्रिय आहेत. मात्र आगरदांडा भागातील दिघी बंदर विकासाचे काम फार मंद गतीने सुरु असून या भागात बंदर विभागाची पूर्ण कामे होऊ शकलेली नाहीत.गेली अनेक वर्ष या भागात काम न झाल्याने आगरदांडा भागातील विकास खुंटला आहे.त्यामुळे स्थानिक लोकांना नोकर्‍या व स्वयंरोजगार मिळू शकलेला नाही.आगरदांडा भागातील बंदर विकासाचे जोरदार सुरु व्हावे आणि या भागाचा कायापालट होण्यासाठी काँग्रेस आय,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्र येऊन काही दिवसापूर्वीच सर्वपक्षीय कृती समिती स्थापन केली होती.
आगरदांडा येथील काम जलद गतीने सुरु होण्यासाठी शनिवारी कृती समितीचे प्रमुख तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुरुड तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्या नेतृत्वाखाली खासदार तटकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.यावेळी त्यांच्या समवेत मुरुड तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष सुभाष महाडिक,शेतकरी कामगार पक्षाचे मुरुड तालुका चिटणीस अजीत कासार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मुरुड तालुका प्रमुख नौशाद दळवी,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष किरण नाईक,राष्ट्रवादीचे अलिबाग-मुरुड विधानसभा अध्यक्ष अमित नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

लक्ष केंद्रित करण्याची विनंती
आगरदांडा भागातील बंदर विकासाची कामे न झाल्याने या भागाचा विकास खुंटला आहे.स्थानिक तरुणांना नोकर्‍या आणि स्वयंरोजगार मिळण्यासाठी सदरच्या पोर्टच्या विकासाचे काम जलद गतीने होणे खूप आवश्यक आहे.आगरदांडा बंदर विकासाचे काम जलद गतीने होण्यासाठी कृती समिती सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी तयार असून खासदार म्हणून आपण येथील काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करावे,अशी विनंती खासदार तटकरे याना करण्यात आली, असल्याची माहिती कृती समितीचे प्रमुख आणि मंगेश दांडेकर यांनी दिली.

दिघी पोर्ट कंपनी व्यवस्थापनासोबत लवकरच मिटिंग लावून सदरचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
– सुनील तटकरे, खासदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -